किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

लोणी खुर्द ता.रिसोड येथे मातंग समाजावर झालेल्या भ्याड हल्या बाबत तहसीलदार मार्फत मा. मुख्यमंत्रीना निवेदन

कारंजा मानोरा: रिसोड तालुक्यातील ग्राम लोणी खुर्द येथील मातंग कुटुंबावर लहुजी साळवे चे बोर्ड का लावले म्हणून गावातील स्वर्ण समाजातील समाज कंटाकांनी मातंग समाज वस्तीवर जाऊन महिलांसह लेकराबाळावर जबर मारहाण करत भ्याड हल्ला केला.यात सात ते आठ मातंग समाजातील लोक गंभीर जखमी झाले.
या घटनेचा विदर्भ लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जाहीर निषेध नोंदविण्यात आला. विदर्भ लहुजी शक्ती सेनेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ रमेश चंदनशिवे यांच्या नेतृत्ववात मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार कारंजा मानोरा यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
निवेदनात सर्व आरोपीना कठोरात कठोर कार्यवाही करून त्वरित अटक करण्यात यावी . समाजातील जखमीन चे त्वरित पुनरवसन करून सामाजिक न्याय विभागामार्फत त्यांना मदत करण्यात यावी. व मातंग समाजावर जे अन्याय त्याचार होतं आहेत हे त्वरित थांबवावेत, याबाबत मा. मुख्यमंत्री ना विनंती करण्यात आली आहे.
डॉ चंदनशिवे यांच्या नेतृवात दिलेल्या निवेदन प्रसंगी समाजातील दीपक वाघमारे अध्यक्ष आणाभाऊ साठे उत्सव समिती कारंजा, विठ्ठल लोंढे, श्याम शिकारे, दशरथ सावळे, संतोष चाबुकस्वार, पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य जयदेव इंगळे, कारंजा मनोर्यातील हजारो समाज बांधव हजर होते.

389 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.