किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

कृषी विभागाचा दणका,राजेश सिड्स ऑन्ड फर्टीलायझर्स व महाजन ट्रेडर्स चा खत परवाना निलबीत

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
 
*नांदेड*:दि.11. जिल्ह्यातील धर्माबाद येथे कांही दिवसापुर्वीच डि.ए.पी.खत मिळत नसल्या बाबद तालुक्यातील शेतकऱ्यांतून तक्रारी होत्या संबधित शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेऊन तालुका कृषी कार्यालय व पंचायत समिती कृषी विभागातर्फे तपासणी करण्यात आली.

आज दिनांक १० नोंव्हेंबर रोजी आर.बी.चलवदे जिल्हा अधिक्षक कृर्षी अधिकारी जिल्हा कार्यालय नांदेड,व डाॅ.तानाजी टि.एन.चिवनशेट्टे जिल्हा कृर्षी विकास अधिकारी जि.प.नांदेड  यांनी तात्काळ दखल घेवुन खत विक्री गोदामाची तपासणी करणे बाबदचे निर्देश दिले होते.श्री सुरेंद्र पवार तालुका कृर्षी अधिकारी कृर्षी कार्यालय धर्माबाद ,व श्री विश्वास अधापुरे कृर्षी अधिकारी पंचायत समिती धर्माबाद यांनी संयुक्त तपासणी करुन अहवाल सादर करण्यात आला होता.व खत विक्रेत्यांना पि.ओ,एस.मशिन साठा व प्रत्यक्ष गोदामात उपलब्द साठ्यात तफावत आढळुन आली
आल्यामूळे राजेश सिडस ऑन्ड फर्टीलायझरच्या चालकास खुलासा करण्याची संधी देण्यात आली होती.परंतू सदर फर्टीलायझर चालकाचा खुलासा अपूर्ण व समाधानकारक नव्हता.तसेच खत नियंत्रण आदेश खंड ३५ (१) (अ) अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३ (२) (I) चे उल्लंघन केल्याचे आढळले.यामूळे कृषी विभाग व खत विभागाने कारवाई करत या फर्टीलायझरचा परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

यामूळे धर्माबाद तालुक्यातील सिडस फर्टीलायझरच्या विक्रेत्यांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.सध्या रब्बी हंगामाचा काळ असून शेतकऱ्यांना खतांची नितांत गरज आहे.खतसाठा करुन कृत्रिम टंचाई निर्माण केल्यास तसेच खत नियंत्रण कायद्यातील नियमांचे उल्लंघन आढळून आल्यास खपवून घेतले जाणार नाही.

तालुक्यातील सिडस फर्टीलायझर व खत विक्रेत्यांनी शेतकऱ्यांची अडवणूक न करता खत नोंद वही अद्यावत करावी.तसेच पो.ओ.एस.मशिन वरील खत साठा व प्रत्यक्ष गोदामातील खत साठा यामध्ये तफावत आढळणार नाही याची कटाक्षाने दक्षता घ्यावी अन्यथा खत नियंत्रण.आदेश 1985 अन्वये.कारवाईला सामोर जावे लागेल असे आवाहन सुरेंद्र पवार तालूका कृषि अधिकारी धर्माबाद व विश्वास अधापूरे पंचायत समिती धर्माबाद यांनी केले आहे .

467 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.