किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

किनवट परिसरातील शेतकऱ्यांना झेंडूच्या फुलांनी दुःखवले..

किनवट (तालुका प्रतिनिधी)

सरकारच्या नियोजन शून्य कृतीमुळे भारतातील शेतकरी अगोदरच मेटकुटीला आलेला आहे त्यामध्ये दिवाळी 2021 ही शेतकऱ्याच्या फुलाच्या जीवावर बेतली आहे दरवर्षी साधारणपणे रुपये चाळीस ते दोनशेपर्यंत झेंडूच्या फुलांना प्रति किलो भाव मिळत असतो, परंतु यावर्षी चक्क 10 रुपये ते 20 रुपये किलो किनवट बाजारांमध्ये झेंडू मिळत होता त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू ऐवजी कुठेतरी तोडणीचा ही खर्च निघत नाही ही भावना सर्वसामान्याला दिसून येत होती, म्हणूनच की काय दिवाळी 2021 शेतकऱ्याच्या झेंडूला झेंडू फोडणारी आहे.


त्यामुळेच शेतकरी हा सध्यातरी झेंडूच्या फुलांनी दुखल्यामुळे झेंडूच्या फुलावरच नाराज आहे म्हणजे ग्राहक हा दरवर्षी त्याला लागेल एवढेच फुले घेत असतो परंतु मागणी व पुरवठा यातील तफावत आज रोजी किनवट येथे व परिसरात दिसून आलेली आहे शेतकऱ्यांनी हजारो क्विंटल झेंडूची फुलं बाजारामध्ये आणली होती परंतु त्या फुलाला कवडीमोल भाव मिळाल्यामुळे यावर्षी संध्याकाळी दिवाळी साजरी करावी कशी करावी हा प्रश्न त्याच्यासमोर उभा टाकला आहे कारण सध्या सोयाबीन ला भाव नाही, कापसाला भाव कवडीमोल आहे. म्हणून शेतकऱ्यांनी त्याचा माल साठवून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. आज ना उद्या कापसाला सोयाबीनला भाव मिळेल या आशेने तो वाट बघत आहे खाजगी सावकारी कर्ज तो भेडण्यासाठी एकच वेळेस माल विकण्याच्या बेतात आहे, जेणेकरून जून महिन्यात सावकार त्याला त्याच्या दारात उभा राहू देऊ शकेल व त्याची चरितार्थ भागवण्यासाठी तो झेंडूची फुले लावत असतो झेंडूच्या फुलाचा फार मोठी अपेक्षा असते परंतु या फुलांनीच दिवाळी ला शेतकऱ्याला भयंकर रित्या दुखावलेला आहे असे जरी असले तरी परिसरातील ग्राहक मात्र त्याला लागेल तेवढी फुले हे थोडाबहुत कमी भावाने मिळत असल्यामुळे थोडंसं स्मित सुख त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं परंतु जगाचा पोशिंदा शेतकरी हा मात्र शेवटी दुःखाचा चेहरा घेऊन बाजारा मध्ये उभा टाकला होता जसा बॉण्ड्री वर सैनिक उभा टाकतो त्याप्रमाणे शेतकरी हा बाजारांमधील उभा टाकला होता कारण व्यापाऱ्यांना शेतकऱ्याला फुले द्यायचे यावर्षी टाळले होते कारण व्यापारी हा दोन ते पाच रुपये किलो होता म्हणून व्यापाऱ्याला फुले न देता शेतकरी स्वतः फुले विकू लागला होता कारण निदान त्याचा तोडनी खर्च तरी निघावा ही भावना त्यांच्या मनात होती परंतु एवढे जरी असली तरी शेवटी शेतकरी हा एक मजबूत अर्थव्यवस्थेचा जवान या अर्थव्यवस्थेचा कणा आहे या भारताला अन्न, वस्त्र देण्याचे काम देण्याचे काम करत असतो तो कधीही डगमगत नसतो परंतु त्याच्या चेहऱ्यावर दुःखाचा भाव निर्माण होऊ नये अशी परिस्थिती निर्माण करणे गरजेचे आहे 70 वर्षांपासून शासन कोणतेही विकासात्मक नियोजन करत नसल्यामुळे सर्वसामान्यांचे मत देखील शेतकऱ्याविषयी सकारात्मक आहे म्हणूनच की काय शेतकरी स्वाभिमानाने आज रोजी भारत देशात जगत आहे
जय जवान जय किसान..

626 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.