जितेश अंतापुरकरांना विजयी करुन महाविकास आघाडीला भक्कम करा-ना. अशोकराव चव्हाण
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
*नांदेड*:दि.9.मुख्यमंञी उद्वधव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकार कोरोना महामारी आणि नैसर्गिक संकटांत राज्यात उत्तम काम करुन राज्याला सुस्थितीत आणले. कोरोनाने निधन झाल्याने होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत दिवंगत आमदार रावसाहेब अंतापुरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापुरकर यांना महाविकास आघाडीने ऊमेदवारी दिली त्यांना विजयी करुन महाविकास आघाडीला मजबुत आणि दिवंगत आ.अंतापुरकरांना विजयी करणे अशी दुहेरी बिलोलीतील मतदारांना पार पाडावी लागेल तीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंञी ना.अशोकराव चव्हाण यांनी बिलोली येथील जाहीर सभेत केले आहे.
काँग्रेसचे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या देगलुर -बिलोली विधानसभेची निवडणुक रणधुमाळी चांगलीच रंगली आहे. काँग्रेस,शिवसेना,राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापुरकर यांच्या प्रचारार्थ ना.चव्हाण यांची सभा शुक्रवारी बिलोली येथील हनुमान मंदीर परीसरात पार पडली.सदर सभेत ना.चव्हाण यांनी केंद्र आणि राज्यपातळीवरील अनेक विषयांना हात घालत केंद्रसरकारच्या निष्क्रीयतेचा जणू पाढा वाचला आणि मोदींच्या कारभारावर सडकुन टिका केली.
या सभेस विधानपरीषदेतील राज्यपाल नियुक्त यादीतील प्रा.यशपाल भिंगे,अनिरुद्ध वनकर यांनी ही संबोधित केले तर आपल्या खुमासदार शैलीत शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख भुजंग पाटील , संपर्क प्रमुख आनंद जाधव यांनी भाजपा उमेदवार साबणे यांनी शिवसेनेसोबत गद्दारी,बेईमानी केली असे सांगुन त्यांच्यावर तोफ डागली.या सभेत माजी खासदार सुभाष वानखेडे,आ.अमरनाथ राजुरकर,आ.मोहन हंबर्डे जिल्हा बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण , काँग्रेस चे माजी जिल्हाअध्यक्ष नामदेवराव केशवे,जि.प.चे माजी अध्यक्ष बाबाराव एंबडवार , नांदेडचे माजी महापौर अब्दुल सत्तार,उपमहापौर मसुद खान , माजी महापौर शमिम अब्दुला ,शिवसेनेचे तालुकाप्रमुख विजय मुंडकर,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नागनाथ पाटील सावळीकर,बिलोली च्या नगराध्यक्षा मैथिली कुलकर्णी , उपाध्यक्ष मारोती पटाईत , राष्ट्रवादीचे नगरसेवक अनुप अंकुशकर,नगरसेवक प्रकाश पोवाडे,अमजद चाऊस , नागनाथ तुम्मोड,वलिओद्दीन फारुखी यांच्यासह सभेस मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांनी केले.सुञसंचलन माजी नगराध्यक्ष भिमराव जेठे तर आभार प्रदर्शन केदार पाटील साळुंखे यांनी मानले.उत्तमआणि शिस्तबद्ध नियोजन केलेल्या माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांची सभास्थळी चर्चा झाली. ”
*पालकमंञी चव्हाण फारुखींच्या निवासस्थानी*
राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हाचे पालकमंञी ना.अशोकराव चव्हाण यांनी अल्पसंख्यांक काँग्रेस कमिटीचे माजी तालुकाध्यक्ष वलिओद्दीन फारुखी यांच्या निवासस्थानी सभेपश्चात भेट देऊन चहापान स्विकारला आहे.ना.चव्हाण यांनी फारुखी यांच्या पक्ष पातळीवरील कामाची तोंडभरुन स्तुती केली . यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.