किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

1व 2 आक्टोंबर रोजी चंद्रपूर ता.किनवट येथे गुरु साहेब यांचा पावन पूर्व आणि दशमीचा महाप्रसाद लभाण संस्कृती/ खेळ स्पर्धा आयोजन

दशमी महोत्सव आणि लभाण संस्कृती दर्शन

किनवट: दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी गुरु साहेब यांचा पावन पूर्व आणि दशमीचा महाप्रसाद लभाण संस्कृती/ खेळ स्पर्धा आयोजन करण्यात आलेले आहे. या वर्षी एक आक्टोंबर ते 2 ऑक्टोंबर 2021 दरम्यान होणार आहे* स्थळ:- चंद्रपूर ता.किनवट जि.नांदेड

श्राद्ध पर्वात साजरा होणारा दशमी महोत्सव हे ह्या ठिकाणाचे आकर्षक आहे. हा उत्सव दोन दिवसांचा असतो. या उत्सवा दरम्यान देशाच्या कानाकोपऱ्यातून लभाण लोकं येथे येत असतात आणि गुरू-संगतचा मनमुराद आनंद घेत असतात. त्याचबरोबर येथे होणाऱ्या लोकनृत्याच्या स्पर्धा हे एक ह्या ठिकाणाचे आकर्षक समजले जाते. एकूणच लभाण संस्कृती दर्शन ह्या दशमी उत्सवात आपल्याला अनुभवता येते. हा उत्सव दरवर्षी साजरा होतो. यावर्षी हा उत्सव 01 ऑक्टोबर ते 02 ऑक्टोबर दरम्यान साजरा होईल. ह्या उत्सवा दरम्यान श्री गुरू संगत आणि प्रसाद चा लाभ घेण्यासाठी ह्या संस्थानाकडुन  महंत श्री. गुलाब सिंह जी महाराज याच्याकडून आवाहन करण्यात येत आहे.

श्री गुरू नानक देव साहिब यांच्याप्रती अढळ श्रद्धा दिसून येते. श्राद्ध पर्वात साजरा होणारा ‘दशमी महोत्सव’ याची प्रचिती देऊन जाते. समाजात हा सण गुरू नानक देव साहिब यांच्या प्रती असलेली श्रध्दा आणि सामजिक ऐक्याचे प्रतिक मानले जाते. समाजात रूढ असलेल्या धारणेनूसार, खुद्द गुरू नानक देव यांनी त्यांच्या दीर्घ प्रवासात लभाण लोकांस उपदेश करून ज्ञानार्जन केले होते अश्या आख्यायिका आजही समाजात रूढ आहेत. तेव्हापासून हा समुदाय त्यांच्या विचाराशी जोडला गेलेला दिसून येतो. महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्हयामधल्या तालुका.किनवट सारख्या दुर्गम भागात चंद्रपूर सारख्या एका छोट्याशा तांड्यामध्ये ‘श्री गुरूसाहिब गुरुद्वारा’ असणे ही एक अलौकिक गोष्ट आहे. हे स्थळ लभाण जमातीसाठी सामजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून नावारूपाला आलेले दिसून येते. शिख समुदायात सुद्धा श्री गुरूसाहिब गुरुद्वारा, चंद्रपूर ह्या आध्यात्मिक केंद्राची नोंद आहे.

68 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.