किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ नांदेड ; स्व.अंजनाबाई कोंडीबाजी खतगावकर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष व ग्रामीण रुग्णालय,धर्माबाद पोलीस स्टेशन,धर्माबाद यांचा संयुक्त विद्यमानाने कोविड- १९ लसीकरण मोहीम

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.22. जिल्यातील धर्माबाद येथे कोविड- १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करत आज (दि.२२) रोजी.स्व.अंजनाबाई कोंडीबाजी खतगावकर सेवा भावी संस्था धर्माबाद,प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हा नांदेड,महाराष्ट्र सामाजिक सुरक्षा समिती काँग्रेसचे नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड व त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका तसेच काँग्रेसचे महिला जिल्हा सरचिटणीस सौ निता गायकवाड यांच्याकडून आज धर्माबाद येथील शास्त्रीनगर येथे लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. शास्त्रीय नगर व इतर भागांतील नागरिकांनी लसीकरणासाठी उत्फुर्स सहभाग नोंदवला आहे. तालुक्यात लसींचे सर्व वयोगटातील डोस उपलब्ध होते व हे सर्व डोस देण्याचे नियोजन संजीवकुमार गायकवाड यांच्याकडून करण्यात आले. धर्माबाद शहरात गेल्या काही महिन्यांपासून विविध पक्षांकडून तसेच विविध कार्यकर्त्यांकडून गणेश गणेशोत्सवानिमित्त,लसीकरण मोहीम वेगाने सुरू असल्याचे चित्र धर्माबाद तालुक्यात व शहरांमध्ये उमटले. जिल्ह्यात मागील काही विज्ञान पासून लसींचा तुटवडा असल्याने लसीकरण झाले नव्हते त्यानंतर लसीचे डोस कमी होण्यास सुरुवात झाल्याने मोहीम थांबवली होती. मात्र काही दिवसातच लसींची डोस मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्याने मोहिमेला वेग आला आहे. केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार नांदेड जिल्हा धर्माबाद तालुक्यात कोविड-१९ अंतर्गत लसीकरण मोहीम राबवण्यात आली आहे. या अंतर्गत सध्या धर्माबाद शहरात 18 वर्षावरील सर्व सुजाण व वयोवृद्ध नागरिकांना मोफत लसीकरण सुरू करण्यात आले आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार धर्माबाद तालुक्यात व शहरात लसीकरण करण्यात येत असून यामध्ये विविध पक्ष,समित्या, व सामाजिक कार्यकर्त्यांकडून लसीकरण मोहिमेवर भर देण्यात आला. तसेच नागरिकांनीही सुद्धा संभाव्य तिसऱ्या लाटेला लक्षात घेऊन लस घेण्यास भर दिली. या मोहिमेसाठी लसीकरण मात्रांची संख्या वाढविण्यात आली असून नागरिकांची गोंधळ न करता या मोहिमेत यशस्वी रुपी सहभाग नोंदविला. केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार तालुक्यातील सर्व शासकीय रुग्णालय, उपकेंद्र,प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णाये आणि जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी मोफत लसीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे.लसीकरणामुळे आतापर्यंत जिल्ह्यात कुणालाही गंभीर स्वरूपाचा त्रास झालेला .
या मोहिमेत वैद्यकीय अधिकारी श्री.डॉ.शेख इकबाल यांनी सांगितले व लसिकरणाबाबतची माहिती कोविड-19 विषयक नियमांबाबतची माहिती नागरीकांपर्यंत त्या मोहिमेअंतर्गत पोहचविले. तेव्हा लसीकरणादरम्यान काही जणांची कोविन अॅपवरून नोंदणी झाली नाही. त्यांना दूरध्वनी करून लस घेण्यासाठी बोलावण्यात आले.कोविड-19 कोरोनाव्हायरसच्या वाढत्या महामारीच्या आव्हानांना आणि धोक्याला तोंड देण्यासाठी आपण तयार आहोत हे सुनिश्चित करण्यासाठी
स्थानिक पातळीवर व्हायरसचा प्रसार रोखण्याचा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे नागरिकांना योग्य माहिती देऊन सक्षम करणे आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे जारी करण्यात आलेल्या सल्लागारांद्वारे सावधगिरी बाळगणे ही काळाची गरज आहे.
महाराष्ट्र सामाजिक सुरक्षा समिती
काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष संजीवकुमार गायकवाड व त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका तसेच काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी नगर सेविका सौ.नीता गायकवाड व समस्त शास्त्रीनगर,फुलेनगर, रमाई नगर,येथील नागरिकांनी अथक परिश्रम घेतले.लसीकरण या मोहिमेत प्रमुख उपस्थिती म्हणून धर्माबाद चे तहसीलदार श्री दत्तात्रेय शिंदे,पोलीस निरीक्षक,श्री सोहन माछरे, ध.न.पा. मुख्याधिकारी सौ.नीलम कांबळे,न.पा.कर्मचारी रूक्‍माजी भोगावार,पोलीस उपनिरीक्षक वाडेकर,गुप्त शाखेचे संतोष अनेराये,वैद्यकीय कर्मचारी व प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघांचे जिल्हाध्यक्ष पत्रकार तथा संपादक संजीवकुमार गायकवाड तसेच,युवा पत्रकार समिती धर्माबाद(YPS) चे पदाधिकारी उपस्थित होते. शास्त्री नगर येथील लसीकरण मोहिमेत तब्बल १६५ नागरीकांना लस देण्यात आली.असे हिंदू सम्राटशि बोलताना संजीवकुमार यांनी सांगितले.

तसेच लसीकरणानंतर कोणत्याही प्रकारचा गंभीर त्रास होत नसून जो सौम्य स्वरूपातील त्रास हा स्वाभाविक आणि उपचारांनी बरा होणारा आहे.ही लस संपुर्ण सुरक्षीत असुन अफवांवर विश्वास न ठेवता कोरोना लसिकरण करुन घ्यावे,असे आवाहन स्थानिक शासनाने यावेळी केले.

92 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.