ठाकरे चौकातील नाली संदर्भात किनवट टुडे न्युज व सम्राट दैनिक साहित्य सम्राट च्या बातमीची दखल;सर्व स्तरातून प्रशासनाचे आभार!
किनवट प्रतिनिधी: गोकुंद्यातील स्व. बाळासाहेब ठाकरे चौकात घाणीचे साम्राज्य;प्रशासनाला कधी जाग येणार!-नागरिकांचा सवाल.
आशयाची बातमी आमच्या चॅनल ने व साहित्य सम्राट पेपर मध्ये प्रकाशित झाली होती.
किनवट टुडे न्युज व सम्राट दैनिक साहित्य सम्राट बातमीची दखल घेऊन येथील कर्तव्यदक्ष ग्रामसेवक प्रवीण रावळे व रविराज क्षीरसागर यांनी एका दिवसात नालीचे काम सुरू करून नालीचे पाणी गोकुंदा येथील ठाकरे चौकात मुख्य रस्त्यावर परिसरातील सांडपाणी जमून रहदारीस अडथळा निर्माण होत होता.
त्यामुळे किनवट टुडे न्यूज चे संपादक आनंद भालेराव व साहित्य सम्राट चे शहर प्रतिनिधी राज माहुरकर यांनी सदरील बातमी प्रकाशित करून येथील ग्रामपंचायत चे ग्रामसेवक व प्रशासक क्षीरसागर यांना सदरील बाब लक्षात आणून दिली .याची दखल घेत त्यांनी लगेच कामालाही सुरुवात केली त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे कारण याठिकाणी मोठी बाजारपेठ व कोचिंग क्लासेस आहेत.नालीचे योग्य नियोजन लावल्याने नागरिकातून दुकानदाराकडून व शालेय अभ्यासक्रम शिकत असलेल्या विद्यार्थ्याकडून प्रशासनाचे आभार मानले असून सोबतच किनवट टुडे न्युज व दैनिक साहित्यसम्राट चे सुद्धा विशेष आभार मानले आहेत.