गौळ अंबुलगा अण्णाभाऊ साठे पुतळा प्रकरणी किनवट येथील उपविभागीय कार्यालयावर बोधडी (खुर्द) येथील मातंग युवा कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवून दिले निवेदन
बोधडी /बाबुराव वावळे :
गऊळ तालुका कंधार अण्णाभाऊ साठे पुतळा प्रकरणी राजकीय दबावापोटी डिव्हिजनचे डि वाइ एस पी यांनी समस्त मातंग समाजावर लाठीचार्ज केला घराघरातुन लोकांना काढून मारहाण केली असून त्यामध्ये अनेक कार्यकर्ते,गावकरी व पत्रकार जखमी झाले आहेत.
या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी किनवट येथील उपविभागीय कार्यालयावर बोधडी (खुर्द)तालुका किनवट येथील मातंग समाजातील युवा कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन करून निवेदन सादर केले. यात विनाकारण लाठीहल्ला करून समाजातील लोकांना जखमी केले. तसेच पुतळा काढून समाजाच्या अस्मितेला ठेच पोहोचली. त्यामुळे या बंदोबस्तास असलेल्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करून तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी चे निवेदनाद्वारे कार्यकर्त्यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट यांच्याकडे केली आहे.
आडेलू बोनगीर, मधुकर गवळे, जनार्धन काळे, गणेश गायकवाड, दिगंबर गादेकर, जनार्दन बसवंते ,बापूराव वावळे ,विष्णू तोटरे, कृष्णा तोटरे ,खंडू सूर्यवंशी ,निखिल मुनेश्वर ,बालाजी कांबळे ,अविनाश वाघमारे ,जिवा गादेकर, बालाजी गायकवाड ,निळकंठ सूर्यवंशी, नितीन गायकवाड ,विकी तोटरे, मारुती गोटमुकले,ज्ञानेश्वर बसवंते, गणेश गायकवाड, दिगंबर गादेकर, शिवाजी गायकवाड, नागनाथ बनसोडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.