किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

धर्माबाद शहरातील अनेक वर्षांपासून स्थाईक साठेनगर,रमाई नगर, शास्त्रीनगर येथील घरे कायमस्वरूपी नावावर करण्यासाठी येथील जनता थेट पालकमंत्री ना.अशोकरावजी चव्हाण यांच्या दालनात

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

*नांदेड*:दि.31. जिल्यातील धर्माबाद शहरात गेल्या अनेक वर्षा पासून लागलते कामे करीत त्यात विट भट्टी कामगार, शेतमजूर,मिस्त्री,रोजंदारी वर करणारे कुटुंब आपल्या कुटुंबाचे ऊदरनिर्वाह करण्यासाठी साठेनगर,रमाई नगर,शास्त्रीनगर येथे राहतात पण शहरातील काही विकृत बुद्धिने राजकारण करत काही पदाधिकारी प्रशासकीय कार्यालय बनविण्याच्या नावाखाली या भागातील गरीब जनतेला बेघर करण्याच्या तयारीत होते पण वेळीच सुजाण नागरिकांनी जागरूकता दाखवत या ठीकाणची जनता थेट नांदेड जिल्ह्याची शान आदरणीय मा. ना.अशोकरावजी चव्हाण साहेब यांची भेट घेऊन सर्वच्या सर्व घरे कायमस्वरूपी नावावर करून नियमित घरे करण्याची आग्रही मागणी करण्यात आली.

यावेळी नामदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी मी आपल्या पाठीशी खंबीरपणे ऊभा असुन कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला बेघर होऊ देणार नाही असा धिर दिला

यावेळी आमदार अमरभाऊ राजुरकर यांनी थेट जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधत सदरील कार्यवाही त्वरित स्थगित करण्याची सूचना केली

यावेळीजिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार वसंतराव चव्हाण साहेब यांनी सदरील लढाईत मी आपल्या पाठीशी आहे असे आश्वासन दिले
यावेळी मा.दत्ताहरी कदम चोळाखेकर धर्माबाद तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी,तथा उपसभापती कृषी उत्पन बाजार समिती,माजी तालुकाध्यक्ष धर्माबाद काँग्रेस कमेटी तथा विद्यमान सदस्य कृषी उत्पन्न बाजार समिती मा.नागभूषण वर्णी,मा.कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य शिवराज मोकलीकर,माजी नगरसेविका सौ.नीता गायकवाड प्रतिनिधी तथा भीमशक्ती सामाजिक संघटनेचे धर्माबाद तालुकाध्यक्ष शिवराज गायकवाड माजी धर्माबाद काँग्रेस कमेटी शहरध्यक्ष ताहेर पठाण,नगरसेवक शेख शादुल मौलाना,लक्ष्मण निदानकर,देविदास निदानकर, माधव सोनकांबळे पांगरीकर,पत्रकार किशन कांबळे,सायलु दासरवाड,व्यंकट ऐडके,शंकर गोणारकर,यादव डाकोरे,जेष्ठ नागरिक नागोराव कोडंलवाडे,विजय वाघमारे,बाबुराव मोतेवार, संभाजी दावलबाजे,संदीप गायकवाड,सुधाकर हराळे,अमृता क्षिरसागर ईत्यादी असंख्य कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती होती.

65 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.