यशस्वी कारखान्यांना प्रश्न विचारणारांनी कारखाने बंद पाडलेल्यांना प्रश्न विचारावे – ना.अशोकराव चव्हाण
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड:दि.30.जिल्यातील अर्धापूर तालुक्या मधील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखानाच्या २८ वी वार्षिक सर्वसाधारणसभेत साखर कारखाने बंद करणारांना प्रश्न विचारण्याऐवजी सुरु असलेल्या साखर कारखान्याला नेहमी का प्रश्न विचारता असे प्रतिपादन कारखान्याचे प्रतोद राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोकराव चव्हाण बोलत होते. आज दिनांक २९ ऑगस्ट रोजी भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे अध्यक्ष गणपतरावजी तिडके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
सर्वसाधारण सभेत मार्गदर्शन करताना पालकमंत्री ना.अशोकरावजी चव्हाण म्हणाले की भाग-भांडवलाशिवाय कोणतेही संस्थान चालेल कसे?. सरकारकडून ३१ कोटी रुपये अनुदान येणे बाकी आहे.त्यात केंद्र सरकारकडे २६ कोटी रुपये बाकी आहे. कारखान्याने आजपर्यंत कोणाचेही पैसे शिल्लक ठेवलेले नाही आणि भविष्यात सुद्धा ठेवणार नाही.
पण जिल्ह्यात जाणून-बुजून राजकारण केले जाते.यापूर्वी हदगावचा कारखाना ज्या व्यवस्थापनाकडे होता त्यांना कोणीही विचारले नाही,त्यांनी किती पैसे बुडवले? सध्या जिल्ह्यात इतर दुसरे कारखाने आहेत त्यांनाही कुणीही विचारत नाही पण भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्यास नेहमी प्रश्न उपस्थित केल्या जाते. कारखान्याच्या व्यवस्थापनाने साखरेचे उत्पन्न कमी करुन इथोनालचे उत्पन्न वाढवावे जेणेकरून त्याचा फायदा शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल.
पुढे बोलताना ते म्हणाले की विमा कंपन्यांनी अनेक शेतकऱ्यांचा विमा बुडवला,ते शेतकऱ्यांना लुटणाऱ्या आहेत.त्यांच्या विरोधात मा.उच्च न्यायालयात खटला दाखल आहे. देशातील पाच राज्यांनी विमा योजना चालवण्यास नकार दिला त्यामध्ये गुजरातराज्य सुद्धा आहे.नांदेड जिल्ह्यात महत्त्वाची विकास कामे महाविकासआघाडी सरकारच्या माध्यमातून सुरू आहे.नांदेड ते मुंबई हा प्रवास बारा तास एवजी सहा तासात होइल.नांदेड जिल्हा समृद्धी महामार्ग जोडण्यात आलेला आहे,त्यामुळे मराठवाड्याचा विकास झपाट्याने होईल. मराठवाड्यात बुलेट ट्रेन सुरू व्हावी यासाठी प्रयत्न करणार.जिल्ह्यात जवळपास साडे चार हजार कोटी रुपयाचे विविध विकास कामे चालू आहेत असे ते म्हणाले.प्रारंभी शंकरराव चव्हाण बायोशुगर या संस्थेच्या इतीवृत्तांत सभेत ठेवण्यात आला. विविध विषय मंजूर करून घेतले.
व्यासपीठावर,माजी राज्यमंत्री मा.डी.पी.सावंत,प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आ.अमरनाथ राजूरकर,शंकरराव चव्हाण बायोशुगर लि.चे अध्यक्ष उद्योजक नरेंद्र चव्हाण,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर,शामराव टेकाळे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील कोंढेकर,ज्येष्ठ संचालक रंगराव पाटील इंगोले,सुभाष कल्याणकर,प्रवीण देशमुख, बालाजी गोविंद शिंदे,मोतीराम जगताप,भीमराव कल्याने, सुभाषराव देशमुख,साहेबराव राठोड,आनंदा सावते, सौ.कमलाबाई दत्तराव सूर्यवंशी, शामराव पाटील,बाळासाहेब शेंदारकर,कार्यकारी संचालक श्यामसुंदर पाटील,बायोशुगरचे उपाध्यक्ष मारोतराव गव्हाणे, संचालिका सौ.रेखाताई चव्हाण, सौ.विद्याताई शेंदारकर, महंतअप्पा बरगळ,प्राचार्य डॉ.रावसाहेब शेंदारकर, केशवराव इंगोले, यांची उपस्थिती होती.
यावेळी अर्धापूर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बालाजी गव्हाणे, मुदखेडचे तालुकाध्यक्ष उद्धवराव पवार,भोकरचे तालुकाध्यक्ष जगदीश पाटील,जिल्हासचिव निळकंठराव मदने,तालुकाध्यक्ष मा. वी.कामाजी अटकोरे,अवधूतराव पाटील,शहराध्यक्ष राजू शेटे, अर्धापूर नगरपंचायत अर्धापूरचे माजी नगराध्यक्ष नासेरखान पठाण,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पप्पू टेकाळे, मुसव्वीर खतीब,इम्रान सिद्दिकी,सभापती अशोक सावंत, बाळू पाटील शेनीकर,संजय लोणे,शंकरराव ढगे,प्रा.डॉ.काझी मुख्तारोद्दीन,उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजीराव धर्माधिकारी यांनी केले तर प्रस्तावित तिडके व आभार संचालक भीमराव कल्याणे यांनी मानले सभेस परिसरातील कारखान्याचे सर्व सभासद,शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.