किनवट शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते सरस्वती विद्या मंदिर पर्यंत जाणारा रस्ता अत्यंत खराब;रास्ता दुरुस्त करण्याची विध्यार्थी व शिक्षकांची मागणी.
किनवट:(आनंद भालेराव)
शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते सरस्वती विद्या मंदिर पर्यंत जाणारा रस्ता अत्यंत खराब झाला असून जागोजागी खड्डे पडल्यामुळे अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे तात्काळ या रस्त्याची दुरुस्ती करून अपघात होण्यापासून टाळावे याकरिता शिक्षक,विद्यार्थी यांनी सहाय्यक उप अभियंता सामाजिक बांधकाम विभाग व सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
सरस्वती विद्या मंदिर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंत सुमारे एक किलोमीटर रस्ता हा अत्यंत खराब झाला असून या वर जागोजागी जीवघेणे खड्डे पडल्यामुळे वाहन चालविताना अपघात होऊन जीवित हानी होण्याची भीती निर्माण झाली आहे. या रस्त्यावर सरस्वती महाविद्यालय असल्याने दिवसभर शिक्षक,विद्यार्थ्यांची वर्दळ असते शिवाय वाहनाची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. सुरुवातीपासूनच हा रस्ता अरुंद असल्यामुळे सदरील ठिकाणी अडथळा निर्माण होत आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून तर या रस्त्यावर जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. शहराला जोडणारा हा प्रमुख रस्ता असताना या रस्त्यावर विद्यार्थी तसेच वाहनांची दिवसभर मोठ्या प्रमाणात वर्दळ असतानाही नगरपालिका प्रशासन या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे अपघाताचे प्रसंग टाळून जीवित हानी टाळण्यासाठी आंबेडकर चौक ते सरस्वती महाविद्यालय पर्यंतचा रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी असे निवेदन सर्व शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी सरस्वती महाविद्यालय व उच्च माध्यमिक वरिष्ठ महाविद्यालय, बीएड कॉलेज किनवट यांच्या तर्फे सहाय्यक जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे.