अंदबोरी(चि) परिसरातील शेतकऱ्याचे कृषी पंप व गावातील वीजपुरवठा वेळोवेळी खंडित
किनवट (प्रतिनिधी) शेतकऱ्याचे कृषी पंप व गावातील वीजपुरवठा वेळोवेळी खंडित होत असल्यामुळे आंधबोरी (चि) सह या परिसरातीलअनेक गावातील नागरिकांना विजे अभावी मोठ्या अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. शेतकऱ्याची व गावकऱ्यांची ही अडचण दूर करून आम्हाला सहकार्य करावे अशी मागणी येथील नागरिकांनी प्रभारी कनिष्ठ अभियंता बोधडी (बु )यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
आंधबोरी, पाटोदा, दहेगाव, देवलानाईकतांडा, पोतरेडी ,रामपूर खैरगुडा, सिंदगी, शासकीय आदिवासी आश्रम शाळा पाटोदा,या गावातील व शिवारातील वीज पुरवठा गेल्या एक ते दीड महिन्यापासून वारंवार खंडित होत आहे त्यामुळे या विजेवर अवलंबून असलेले कृषी पंप ,पिठाच्या गिरण्या व विविध विजेवर चालणारी उपकरणे बंद होत आहेत गेल्या पंधरा दिवसापासून या भागात पावसाने उघडीप दिली होती शेतकऱ्याचे पिक पावसाअभावी माना टाकून देत होते पण या पिकाला पाणी देण्यासाठी वीज पुरवठा होत नसल्यामुळे कृषिपंप लावता येत नव्हते त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी पंचायत झाली. तसेच या गावाला सब स्टेशन टीनगणवाडी येथून वीजपुरवठा होतो. येथील कार्यरत कर्मचाऱ्यांना या विजेच्या अडचणी बद्दल विचारणा केली असता समोरील लाईन व्यवस्थित नसल्यामुळे आम्हालाच अडचण येत आहे असे सांगितले जाते.हा वीजपुरवठा बोधडी बुद्रुक येथील कनिष्ठ अभियंत्याच्या कार्यालयाच्या अंतर्गत येतो वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी या अधिकाऱ्यांना वारंवार तोंडी सूचना दिल्या पण त्यांनी हो करतो बघतो असे उत्तर देत आहेत तसेच कार्यरत लाईनमन गावकऱ्यांना कसल्या प्रकारचे सहकार्य करत नाही. गावातील डीपी ची साधी फ्युज गेली तरी वीज पुरवठा खंडित करून फ्यूज टाकण्यासाठी त्यांना फोन केला तर त्यांच्या फोनची फक्त बेल जाते पण ते उत्तर देत नाहीत. त्यामुळे येथील गावकऱ्यांना अत्यंत त्रासाला तोंड द्यावे लागत आहे.वारंवार होणारी अडचण दूर करून वीज ग्राहकास सहकार्य करावे अशा प्रकारचे निवेदन आंध बोरी( ची) , पाटोदा, दहेगाव रामपूर, पोथरेडी सिंदगी सह अनेक गावातील नागरिकांनी कनिष्ठ अभियंता बोधडी, कनिष्ठ अभियंता गोकुंदा ,सहाय्यक अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी किनवट ग्रामीण २, कार्यकारी अभियंता विभागीय कार्यालय भोकर, अधीक्षक अभियंता नांदेड यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.