किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

“गीते वामनांची” शास्त्रीय संगीताच्या अविष्काराने महाकवी वामनदादा कर्डक जयंती साजरी

किनवट : देशभक्ती, हुंडाबंदी, पर्यावरण, चित्रपट गीते, प्रेमगीते, लोकगीते यासह परिवर्तनवादी महामानवावर अकरा हजाराहून अधिक गीते लिहिलेल्या महाकवी वामनदादा कर्डक यांची ९९ वी जयंती आदीजन संस्था संचलित वामनदादा कर्डक संगीत अकादमी राजर्षी शाहूनगर गोकुंदा येथील संचालक सुरेश पाटील यांच्या नागसेनवन निवास येथे गीते वामनांची ह्या शास्त्रीय संगीताच्या अविष्काराने साजरी करण्यात आली.
सम्राट अशोक बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष भारत कावळे कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. पंजाब शेरे, अशोक सर्पे, बंडू भाटशंकर, उपस्थित होते. वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोहर शिंदे व शब्दांजली शिंदे या दाम्पत्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. बौद्धाचार्य अनिल उमरे व भारतीय बौद्ध महासभेचे तालुका सरचिटणीस महेंद्र नरवाडे यांनी वंदना घेतली.

पुरियाधनश्री रागातील ‘करिते पूजा मी… ‘ या वामनदादांच्या वंदन गिताने संगीतविशारद आम्रपाली वाठोरे यांनी लयबद्ध प्रारंभ करून कामराज माडपेलीवार यांच्या साथीने ‘मेरा कर्मा तू…’, देशभक्ती गीत व कोरोना लसीकरण युगल गीत सादर केले. प्रज्ञाचक्षू गायक प्रदीप नरवाडे यांनी मिश्र रागातील ‘एकीने वार करा रे… ‘, ‘माय बापाहुन भिमाचे…’ व वामनदादांची ‘ मी वादळ वारा… ‘ ही रचना गाऊन प्रचंड टाळ्या मिळविल्या.
सुरेश पाटील यांनी विभास रागातील ‘समाजाचं काय?… ‘ हे वामनदादांचे संदेश गीत सादर केले. कामराज माडपेलीवार यांनी ‘ऐ वतन ऐ वतन…’ देशभक्ती गीत, रुपेश मुनेश्वर यांनी ‘जगातली देखणी बाई मी भिमाची लेखणी … ‘ ही वामनदादांची रचना आलाप ताना घेत गायिली. पुणे येथील प्रकाश सोनवणे यांनी ‘चांदण्याची छाया ‘ …, रेखा सोनवणे( पुणे) यांनी ‘शाळेत मला का दूर बसवले जाई … ‘ हे भावना प्रधान गीत गाईले. युवा गायक भीमराव पाटील यांनी ‘उद्धरली कोटी कुळे … ‘ तर बालाजी वाढवे यांनी ‘बोधी गयेचा शीतल वारा …. ‘ गाऊन रसिकांना खिळवून ठेवले.
कार्यक्रमाचे निवेदन उत्तम कानिंदे यांनी केले. सुषमा पाटील यांनी आभार मानले. संयोगिनी प्रकाश सोनवणे, सिंथेसायझर प्रदीप नरवाडे, तबला सुरजकुमार पाटील, ढोलक व्यंकट मुंडावरे, ढोलकी साहेबराव वाढवे यांनी संगीताची साथसंगत केली. राष्ट्रदीप कयापाक यांनी ध्वनीक्षेपण व्यवस्था केली.
याप्रसंगी राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक रमेश मुनेश्वर, डॉ. शामराव , मारोतराव सुर्यवंशी (वनविभाग), मुख्याध्यापक सी. एम. गायकवाड, आकाश मोरेवार, विवेक कांबळे, सुजित नगारे, सुनील कांबळे, स्मिता कानिंदे, सुवर्णा मुनेश्वर, प्रांजली कानिंदे, निवेदक कानिंदे,अभिधम्म पाटील, प्राजक्ता कांबळे आदिंसह बहुसंख्य संगीत रसिक उपस्थित होते.

86 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.