किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या किनवट तालुका अध्यक्षपदी आशिष शेळके,सचिव पदी नसीर तगाले तर कार्याध्यक्षपदी सय्यद नदीम यांची निवड

नांदेड,किनवट : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या किनवट तालुका अध्यक्षपदी आशिष शेळके, सचिव पदी नसीर तगाळे तर कार्याध्यक्षपदी सय्यद नदीम यांची निवड करण्यात आली आहे. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख आनंद भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.
या बैठकीत दैनिक सकाळचे किनवट शहर प्रतिनिधी अशिष शेळके यांची तालुका अध्यक्षपदी, आज की न्यूजचे संपादक नसीर तगाले यांची तालुका सचिवपदी तर दै.पुष्टभूमीचे तालुका प्रतिनिधी सय्यद नदीम यांची तालुका कार्याध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली आहे.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड, जिल्हा संघटक विशाल पवार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सदरील निवड केल्याचे जिल्हा संपर्क प्रमुख आनंद भालेराव यांनी सांगितले.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ हा पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात अहोरात्र काम करीत आहे.
किनवट तालुक्यातही सदर संघटनेच्या माध्यमातून आपण उत्तम कार्य करून दाखवून वरिष्ठांचा विश्वास संपादन करू असा विश्वास नूतन तालुकाध्यक्ष अशिष शेळके यांनी व्यक्त केला. उर्वरित कार्यकारिणीची निवड वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार लवकरच करण्यात येईल असे सांगितले.
याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या इलेक्ट्रॉनिक प्रेस मिडीयाचे तालुका उपाध्यक्ष शेख अतिफ, रेहान खान, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या निवडीबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य पदाधिकारी, विभागीय पदाधिकारी, जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

106 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.