किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

स्तनपान कक्ष अहोरात्र उघडे असावेत- महिला बाल विकास मंत्री ॲड. ठाकूर यांचे आदेश

अमरावती :अमरावती जिल्हा एसटी बस डेपो मधील महिलांसाठी असलेला स्तनपान कक्ष हा बंद स्थितीत आढळल्यानंतर महिला आणि बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर संतापल्या कोणत्याही बसस्थानकामध्ये असलेला स्तनपान कक्ष हा स्तनदा माता यांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेला आहे त्यामुळे तो अहोरात्र उघडाच असला पाहिजे असे आदेश ठाकूर यांनी एसटी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिलेत त्यांनी आज अमरावती बस डेपो मध्ये जाऊन अचानक पाहणी केली असता ही बाब समोर आली.
नवजात बालकांना स्तनपान करता यावे यासाठी राज्यात अनेक जिल्हा बस स्थानकांमध्ये स्तनपान कक्षाची उभारणी महिला बाल विकास विभागामार्फत करण्यात आली आहे मात्र कित्येकदा या स्तनपान कक्षाची दुरावस्था असते अथवा तो बंद स्थितीत असतो अशीच परिस्थिती अमरावती जिल्हा एसटी बस स्थानकांमध्ये अचानक भेट दिली असता महिला आणि बालविकास मंत्री एडवोकेट ठाकूर यांना आढळली. यावेळी त्यांनी संबंधित एसटी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना बोलावून हा स्तनपान कक्ष उघडा ठेवण्याच्या सूचना दिल्या तसेच स्तनदा मातांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याविषयी बजावले. दरम्यान अमरावती बस स्थानकात आढळलेल्या एका महिला भिकाऱ्याची चौकशी करून सदर महिलेला आश्रमात दाखल करण्याविषयी धिकार्‍यांना सूचना दिल्या तसेच कोणीही भीक मागणार नाही, याची दक्षता घ्यावी अशा सूचनाही ठाकूर यांनी यावेळी दिल्या.

191 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.