अखिल भारतीय पत्रकार परिषदे कडुन आयोजित दिवंगत प्रा.किशनराव किनवटकर यांना श्रध्दांजली अर्पण करण्याकरिता सर्व पक्षिय कार्यक्रमाचे आयोजन
किनवट ता.प्र दि ०५ दिवंगत प्रा.किशनराव किनवटकर यांना श्रध्दांजली अर्पण करण्याकरिता आज सर्व पक्षिय कार्यक्रम अखिल भारतीय पत्रकार परिषदे कडुन आयोजित करण्यात आला
यावेळी कै.किशनराव किनवटकर यांच्या सामाजिक, राजकिय संघर्षाच्या व अनुभवांच्या आठवणींना मान्यवरा कडुन उजाळा देण्यात आला. किनवट जिल्हा व्हावा हि त्यांनी सुप्त इच्छा होती याकरिता त्यांनी किनवट ते थेट मुंबई पर्यंत आंदोलने केली याकरिता सर्व पक्षिय आंदोलन उभारुन जिल्हाच्या मागणीचा पाठपुरावा केला. तर किनवट सारख्या दुर्गम भागात राहुन देखिल प्रशासनास दखल घेण्यास भाग कसे पाडावे हे कौशल्य त्यांच्याकडे होते.
या अशा अनेक आठवणीसह जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण यांचे व कै.किशनराव किनवटकर यांचे असलेले घनिष्ठ संबध यामुळे किनवट तालुक्यातील राजकिय परिघ हे त्यांच्या उपस्थिती शिवाय पुर्ण होत नसे. त्यांच्या अशाच आठवणींना आजच्या श्रध्दांजलीच्या कार्यक्रमात उजाळा देण्यात आला यावेळी डॉ अशोक बेलखोडे, अशोक नेम्मानिवार, गंगारेड्डी बैनमवार, नारायणराव सिडाम, दिनकर चाडावार, अखिल खान, इसा खान, भुमन्ना कंचर्लावार, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, सिराज जिवाणी, प्रदीप वाकोडीकर, पवार गुरु स्वामी, तुकाराम बोनगीर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष के. मुर्ती, सुधाकर कदम, प्रा. सागर शिल्लेवार, प्रमोद पोहरकर, शरद जयस्वाल, कचरु जोशी, सुरेश कावळे, किरण ठाकरे, बालाजी सिरसाठ, मधुकर अन्नेलवार, आडेलु, बोनगीर, प्रेम जाधव, संतोष अनंतवार, गंगाधर कदम, विलास सुर्यवंशी, गजानन राठोड, शिवाजी काळे, सुहास मुंडे, गौतम येरेकार यांची उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे सचिव प्रकाश कार्लेवाड यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी नगराध्यक्ष के. मुर्ती, पत्रकार परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष किशन भोयर, प्रदीप वाकोडीकर यांनी परिश्रम घेतले.