प्राध्यापक उमाकांत इंगोले प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाल्याबद्दल संभाजी ब्रिगेडच्या वतीने सत्कार संपन्न
किनवट: बळीराम पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथील गणित विषयातील गाढे अभ्यासक प्राध्यापक उमाकांत इंगोले हे आपल्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने सत्कार करण्यात आला.
प्रा.उमाकांत इंगोले सर हे 1987 साली किनवट गोकुंदा,सारख्या आदिवासी भागातील बळीराम पाटील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून त्यांनी सेवेस प्रारंभ केला.त्यावेळी आदिवासी बहुल डोंगराळ भागात शिक्षणाची कुठल्याच प्रकारे सोईसुविधा नसतांनाही संस्थेचे अध्यक्ष मा.खा.कै.उत्तमरावजी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सोबतीला सवंगड्यांना त्यांनी सोबत घेऊन गोरगरीब ग्रामीण भागातील शेतकरी कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले.
1990 मराठा सेवा संघाच्या स्थापणे पासून त्यांनी संघटनेत वेगवेगळ्या पदावर कार्य केलं त्यांनी किनवट मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष म्हणून बराच काळ काम पाहिलं.त्याच बरोबर अंधश्रद्धा निर्मुलन आशा वेगवेगळ्या संघटनेतही त्यांनी बहुजन समाजातील विविध पदावर कार्य केलं.मराठा सेवा संघाच्या माध्यमातून त्यांनी संभाजी ब्रिगेडच्या युवकांना सतत आपल्या कार्य कौशल्यातून मार्गदर्शन केलं.
प्रा. उमाकांत इंगोले सर हे 31-जुलै 2021 रोजी महाविद्यालयातील 34 वर्षाच्या त्यांच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले.त्यांचा किनवट संभाजी ब्रिगेडच्या वतीने सत्कार करण्यात आला.व सरांना पुढील निरोगी दिर्घआयुष लाभो ह्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बालाजी सिरसाट, तालुकाध्यक्ष सचिन कदम जिल्हा कार्याध्यक्ष गोविंद आरसोड विधानसभा अध्यक्ष शिवा पवार राष्ट्रवादीचे महेश चव्हाण शुभम अनंतवार आदी उपस्थित होते…