मौजे ठाकूरवाडी ते रायपूर रस्ता अतिक्रमण हटवून दुरुस्त करण्यात यावा गावकऱ्याची मागणी
किनवट/प्रतिनिधी: मौजे ठाकूरवाडी ते रायपूर दोन किलोमीटर रस्त्यावरील अतिक्रमण हटवून मोडकळीस आलेले दोन पूल दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी रायपूर तांडा येथील रहिवाशी सुशील गोकुळ राठोड व व ठाकूरवाडी येथील रहिवाशांनी केली आहे.
सदरील रस्ता अनेक वर्षापासून अत्यंत खराब स्थितीत असल्यामुळे या ठिकाणाहून ये जा करणे कठीण झाले आहे. सदरील रस्ता व्हावा या दृष्टिकोनातून 2014 ते 16 पासून निवेदने देऊन सुद्धा अद्याप पर्यंत या बाबीची दखल कोणीही घेतली नाही तेव्हा माननीय तहसीलदार साहेबांनी या बाबीकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन सदरील रस्ता दुरुस्त करावा व तुटलेल्या फुलाचे बांधकाम करून येथील प्रवाशांना दिलासा द्यावा असे मागणी सदरील गावच्या रहिवाशांनी केली आहे.
114 Views