रोलर स्केटिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्याला विभागीय स्पर्धेत डावले
किनवट/प्रतिनिधी:जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग च्या 29 सप्टेंबर रोजी नांदेड येथील जिल्हा क्रीडा संकुलात शालेय क्रीडा पार पडल्या. कोठारी येथील इंटरनॅशनल स्कूल मधील इयत्ता पाचवी मध्ये शिकणारा स्पर्धक विद्यार्थी नामे मोहम्मद जैन याने प्रथम क्रमांक पटकावल्या नंतरही 6 ऑक्टोंबर रोजी लातूर येथे आयोजित केलेले विभागीय स्तरीय स्पर्धेपासून रोखण्यात आले. खाजगी कोच कडून स्केटिंग किट न खरेदी केल्याचा राग मनात ठेवून क्रीडा स्पर्धेच्या अध्यक्षा खाजगी प्रशिक्षक इमरान खान आणि क्रीडा कार्यालय प्रशासनाने मोहम्मद जैनला वगळून इतरांची निवड केली त्यावर तक्रारीद्वारे आक्षेप घेऊन या त्रिकुटांच्या कामकाजाची जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी चौकशी करून कारवाई न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालय समोर न्याय मागणीसाठी उपोषण करणार असल्याचा गर्भित इशारा पालक शब्बीर जावेद खान यांनी 24 ऑक्टोबर रोजी केलेल्या तक्रारीत दिला आहे.
6 ऑक्टोंबर रोजी लातूर येथे संपन्न झालेल्या रोलर स्केटिंग विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेतून वगळल्यानंतर मोहम्मद जैनला पात्र असूनही स्पर्धेतून वगळण्याचे प्रकार उघड झाले 12 सप्टेंबर रोजी नांदेड येथील गुरुगोविंद सिंगजी स्टेडियम परिसरात जिल्हा क्रीडा संकुल इंडोर हॉलमध्ये रोलर स्केटिंग शालेय क्रीडा स्पर्धा पार पडली असून 11 वर्षे वयोगटातील मोहम्मद जैन या स्पर्धकाने संकेतस्थळावर नोंदणी केली होती या स्पर्धेत त्याने प्रथम क्रमांक पटकावल्यानंतरही क्रीडा स्पर्धक अध्यक्ष शिवकांता देशमुख खाजगी प्रशिक्षक इमरान खान आणि जिल्हा क्रीडा प्रशासनातील काहींच्या संगनमताने मोहम्मद जैनला पात्र असताना डावलून लागेबांध्यातील नांदेड येथील खेळाडूची निवड केल्याचे तक्रारीत नमूद आहे. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी निपक्षपाती पणे चौकशी करून कार्यवाही करावी कारण स्पर्धेत दरम्यानचे चित्रीकरण करण्यात आले आहे टाळाटाळ करण्याचा प्रकार घडल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर न्याय मागणीसाठी आणि प्रकरण दडपणाऱ्याच्या विरुद्ध सुद्धा कारवाई करावी अशी न्याय मागणी घेऊन उपोषण करण्याचा टोकाचा इशारा शब्बीर खान यांनी दिला आहे.