किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

सुवर्ण क्रांतीचे जनक हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष माजी खासदार हेमंत पाटील यांना ‘मंत्री’ पदाचा  दर्जा

किनवट : सुवर्ण क्रांतीचे जनक हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे सुरु झालेल्या मा. बाळासाहेब ठाकरे हळद (हरिद्रा) संशोधन केंद्राचे अध्यक्ष  तथा हिंगोली लोकसभेचे माजी खासदार हेमंत पाटील यांना राज्य  शासनाने  “मंत्री” पदाचा दर्जा देऊन त्यांच्या कार्याचा गौरव  केला आहे. ही हिंगोली लोकसभेसाठी अभिमानाची बाब आहे. याबद्दल येथील राजमाता जिजाऊ चौकात शिवसैनिकांनी जल्लोष करून  मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानले आहे.

        यापूर्वी पाटील यांच्या प्रयत्नामुळे वसमतच्या हळदीला केंद्र सरकारने जीआय मानांकन दिले आहे. त्यानंतर आता “मंत्री” दर्जा मिळाल्यामुळे हळद संशोधन केंद्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
            मराठा समाजासाठी राजीनामा देणारे पाहिले खासदार, तिकीट जाहिर होवून प्रचारास लागल्या नंतर अत्यंत मानहानी पूर्वक त्यांना उमेदवारी नाकारली होती. तरीही ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहिले. अशा हेमंत पाटील यांना आज न्याय मिळाल्याची भावन कार्यकर्त्यामध्ये आहे. देशातील पहिले हळद संशोधन केंद्र हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे होत आहे.  याचे कारण म्हणजे हिंगोली जिल्ह्यात पिकविण्यात येणाऱ्या हळदीची गुणवत्ता आणि देशभरात नाव होण्यासाठी ते मोठे प्रयत्न करीत आहेत. 50 लाख टन हळदीचा वापर होतो, त्यापैकी निम्मी हळद महाराष्ट्रात आणि प्रामुख्याने हिंगोली , परभणी, नांदेड,व यवतमाळ जिल्ह्यात उत्पादीत होते.  हळद संशोधन केंद्र हे पूर्णपणे शेतकऱ्यांच्या हितासाठी उभारले असून हिंगोली जिल्ह्याच्या हळदीला जागतिक दर्जा प्राप्त व्हावा याकरिता माजी खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभेची धुरा हाती घेतल्यानंतर सुरवात केली होती व सातत्याने याचा पाठपुरावा करून हे केंद्र मंजूर करून घेतले. त्याला राज्य शासनाकडून भरीव निधी सुद्धा मंजूर करून घेतला आहे. त्यानंतर  संशोधन केंद्राच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला जात आहे. सर्वप्रथम वसमतच्या हळदीला जीआय मानांकन प्राप्त झाले आहे. हळद संशोधन केंद्राच्या माध्यमातून आजपर्यंत सलग दोन वर्ष मुंबई येथे  जागतिक हळद परिषद घेण्यात आली होती. यामध्ये राज्यातील हळद उत्पादक शेतकरी आणि जागतिक स्तरावरील नामांकित कंपन्या यांचा समेट घडवून आणला होता. तसेच जागतिक स्तरावर वेगवेगळ्या देशात हळदीपासून तयार होणारे उत्पादन  याबाबतची माहिती सुद्धा मिळाली. हळद संशोधनात  आजवर केलेल्या कार्यामुळे नुकत्याच मुंबई येथे पार पडलेल्या जागतिक हळद परिषदेमध्ये एनसीडीएक्स ने  माजी खासदार  हेमंत पाटील यांचा गोल्डन मॅन पुरस्कार देऊन  गौरव केला.
       मसाला वर्गीय पिकांमध्ये शासन दरबारी दुर्लक्षित असलेले हळद या पिकावर गेल्या दशक भरापासून काम करत असलेले  हेमंत पाटील  खासदार झाल्यानंतर हळद पिकासाठी महत्त्वाचे काम केले आहे. ते स्वतः केंद्राच्या  स्पाईस बोर्डावर होते. स्पाईस बोर्डाच्या माध्यमातून दक्षिणेकडच्या राजकारण्यांनी ज्या पद्धतीने त्या भागात पिकणाऱ्या मसाला वर्गीय इलायची, दालचिनी, लवंग  ई. पिकांना महत्व प्राप्त करून दिले. त्या पद्धतीचे महत्व प्राप्त करून देण्यासाठी माजी खासदार हेमंत पाटील यांनी सातत्याने प्रयत्न केले. या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रामध्ये वसमत येथे 65 एकर जागेमध्ये हळद संशोधन केंद्र साकार होत आहे. महाराष्ट्र शासनाने या केंद्रामध्ये टिश्यू कल्चरच्या  माध्यमातून दुप्पट उत्पन्न देणाऱ्या आणि जास्त करकुमीन असणाऱ्या हळदीच्या प्रजाती निर्माण केल्या असून मोठा प्रक्रिया उद्योग व विकीरण केंद्र उभे राहत आहे. या सर्व प्रकल्पाला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी 800 कोटीच्या निधीला मान्यता दिली असून यामुळे या भागात हळदीचे मोठे उद्योग उभे राहत आहेत. या भागातील बेरोजगारी दूर होऊन व्यापार वाढीस चालना मिळणार आहे. सन 2010 ते 2020  या दरम्यान पाच हजार रुपयांच्या पुढे न सरकणारा हळदीचा भाव आज13 हजार ते 42  हजार पर्यंत पोहचला आहे. यामुळे शेतकरी सुद्धा समाधानी आहेत.
         राज्य शासनाने इतर आयोग आणि मंडळांच्या अध्यक्षांना यापूर्वी  कॅबिनेट दर्जा देऊन सन्मानित केले आहे. त्याच धर्तीवर आता हळद  संशोधन केंद्राचे अध्यक्ष तथा  माजी खासदार हेमंत पाटील यांना ‘ मंत्री’ पदाचा दर्जा  देऊन त्यांच्या कार्याचा एकप्रकारे गौरव केला आहे. हळदीचा वापर दैनंदिन जीवनापासून ते औषध निर्मितीसाठी  केला जातो. त्यामुळे हळदीला देश आणि जगभरातून मोठी मागणी आहे. या पिकास किड कमी प्रमाणात लागते पाण्याचा वापर कमी प्रमाणात होते. नैसर्गिक आपत्तीस तोंड देणारे हे नगदी पीक आहे. संशोधन केंद्रामध्ये शेतकऱ्यांना गुणवत्ता असलेले उती संवंर्धीत (टिश्यू क्लचर) पेरणीच्या वेळी होणाऱ्या खर्चात किमान 25 हजार रुपये बचत होणार आहे. शेतकऱ्यांना निरोगी व उत्पन देणारे रोप  मिळणार आहेत. प्रयोगशाळा, हळद प्रक्रीया केंद्र, विकीरण केंद्र करण्यात येत आहे. जागतिक दर्जाचा देशातील हा एकमेव प्रकल्प आहे. या माध्यमातून स्थानिक शेतकऱ्यांची हळद निर्यात केली जाईल, त्याच बरोबर बेरोजगारांना रोजगार मिळण्यास मोठी मदत होणार आहे आणि हिंगोली सह नांदेड , परभणी व यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे. आणि या मंत्री पदाच्या उपलब्धीमुळे हळद संशोधन केंद्राच्या कामाला गती मिळणार आहे यात दुमत नाही. केंद्रात आता या कामाला गती मिळणार आहे.


        यावेळी किनवट शहर प्रमुख सुरज सातुरवार, माजी नगराध्यक्ष सुनील पाटील, मनोज तिरमनवार, दिशा समिति सदस्य मारोती सुंकलवाड, जनसंपर्क अधिकारी सुनिल गरड,युवासेना तालुकाप्रमुख अजय कदम पाटील , युवासेना शहरप्रमुख साई पालेपवाड, उप तालुकाप्रमुख कपिल रेड्डी, दया पाटील,अनुराग ठोंबरे , वेदांत भंडारे , समीर जायभाये, नरसिंग नेम्माणीवार, सोनू माने, विक्रांत दगुलवार, एकनाथ तेलवरे , आदित्य आंधळे, साई नैताम, किरण भालेराव , प्रितेश पवार, फिरोज चाऊस, साई पेंदोर, शशिकांत शिवनकर, विपीन पवार, किरण येरमे यासह पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक बहुसंख्येनं उपस्थित होते.

150 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.