मातंग समन्वय समिती महाराष्ट्र तर्फे 15 सप्टेंबर 2024 रोजी लोनगाव जि. बुलढाणा येथे कार्यशाळा संपन्न
बुलढाणा/प्रतिनिधी: मातंग समन्वय समिती महाराष्ट्र तर्फे 15 सप्टेंबर 2024 रोजी जि. प.शाळा लोनगाव जि. बुलढाणा येथे कार्यशाळा संपन्न झाली.
सदरील कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून मा एडवोकेट विलास साबळे( राज्य प्रवक्ते तथा समन्वयक मातंग समन्वय समिती महाराष्ट्र राज्य), मा.प्रा.राजू गोफने सर, मा. सुनील भाऊ लोखंडे (जिल्हाध्यक्ष मातंग समन्वय समिती बुलढाणा), मा. प्रा.गजानन खरात सर हे होते.
यात 1)आरक्षण उपवर्गीकरण निकाली योग्य की अयोग्य व मातंग तरुणांची भूमिका? 2) मातंग चळवळीत मातंग तरुणाचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे? 3) मातंग विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दृष्टिकोन कसा असला पाहिजे? 4) कार्यशाळेला आलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या प्रश्न, शंका यांचे समाधान. या मुद्द्यावर येथे चर्चा चर्चा करण्यात आली व प्रमुख मार्गदर्शकांनी कार्यशाळेस मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेचे आयोजन समस्त मातंग समाज लोणगाव- सातेफळ जिल्हा बुलढाणा यांनी केले होते.