किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांनी प्रशासनास वस्तुनिष्ठ माहिती द्यावी, नागरिकांनी सर्व विभागप्रमुखांना साथ देऊन विकास साधावा -सहायक जिल्हाधिकारी कावली मेघना

किनवट : जनता व प्रशासन यातील महत्वाचा दुवा असलेल्या ग्रामस्तरावरील तलाठी व ग्रामसेवक यांनी आपल्या वरिष्ठांना कोणतीही माहिती वस्तुनिष्ठपणे द्यावी. त्यावरूनच प्रशासकीय अधिकाऱ्यांना सर्वसामान्यांच्या हितासाठी शासनाच्या योजना थेट त्यांच्यापर्यंत यशस्वीपणे पोहचविता येतील. तसेच नागरिकांनीही वेळोवेळी सर्व विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांना साथ देऊन आपल्या गावचा, परिसराचा विकास करून घ्यावा, असे प्रतिपादन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कावली मेघना (भाप्रसे) यांनी केले.
येथील तहसील कार्यालयात महसूल पंधवडा निमित्त बुधवारी (दि. 07) आयोजित विविध प्रमाणपत्र व योजनेसह नैसर्गिक आपत्तीचे धनादेश वाटप आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्या गौरव कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या.
यावेळी किनवटच्या तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर, माहूरचे प्रभारी तहसीलदार कैलास जेठे , नायब तहसीलदार विकास राठोड, नंदन त्रिभूवन , रामेश्वर मुंडे , प्रकल्पाधिकारी कार्यालयाचे अधिक्षक अनिल कवडे मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी आमदार भीमराव केराम यांचे स्वीय सहायक संतोष मरसकोल्हे यांनीही हजेरी लावली होती.
उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. याप्रसंगी तहसीलदार डॉ. चौंडेकर यांनीही आपले विचार मांडले. याप्रसंगी मयत जनावरांऐवजी नवीन पशुधन खरेदीसाठी अल्पभूधारक शेतकरी यांना मदत, घरपड लाभार्थी मदत , संजय गांधी निराधार योजने अंतर्गत लाभार्थींना मदत , दिव्यांगांना अंत्योदय , प्राधान्य कुटूंब योजना , नवीन ई शिधापत्रिका , जात, रहिवाशी , उत्त्पन्न प्रमाण पत्र , वैयक्तिक वनहक्क मंजूर झालेल्या आदिम कोलाम जमातीच्या दावेदारास मालकी प्रमाणपत्र , कृषी विभागाकडून नॅनो युरिया /डीएपी व गट नोंदणी प्रमाण पत्र वाटप, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकारी-कर्मचारी , बीएलओ , विद्यार्थी , स्वयंसेवक व माजी सैनिक यांचा प्रशस्त्रीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
अतिदूर्गम वाघदरी येथील पाच अनुसूचित जमाती प्रवर्गातीला व पाच विमुक्त जाती भटक जमाती , इतर मागास प्रवर्गातील लाभार्थींना जातीचे प्रमाण पत्र वाटप करण्यात आले. वाघदरीच्या ग्रामस्थांनी मॅडम आमच्या गावी या , आमच्या समस्या पहा असे निमंत्रण दिल्यावरून सहायक जिल्हाधिकारी कावली मेघना म्हणाल्या , मूलभूत गरजांसाठी आवश्यक बाबींचा आपल्या ग्रामपंचायतीचा ठराव आम्हास द्या , आम्ही वरिष्ठांकडे पाठपुरावा करू , आपल्या गावी 20 ऑगष्ट नंतर जरूर येईलच !
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अव्वल कारकून विजय सुरुशे , दीपाली पिंजरकर , कैलास कांबळे, महसूल सहायक पी.पी. सूर्यवंशी , गोविंद पांपटवार , पुसनाके, अर्चना कर्णेवाड , एस.बी. पवार , सविता रणखांब , फिरोज खान , लिंबेश राठोड, नामदेव धोंड , संतोष मुपडे , अमोल वाघाडे , मनोहर पाटील , वनहक्क व्यवस्थापक महेश राठोड आदिंनी परिश्रम घेतले .

207 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.