किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

*ऊठा दिव्यांगानो जागे व्हा! आपल्या हक्कासाठी संघर्षासाठि क्रांतिकारी लढाईसाठी मुंबई मंत्रालय घेरावा घोषणेने कुंभकर्ण जागे करण्यासाठी दि.१० जुलै २०२४ च्याआंदोलनात आपला त्रिव्र संताप दाखविण्यासाठी सहभागी व्हा चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांचे आव्हान*

जिल्हा प्रतिनिधी,
महाराष्ट्रातील मंत्रीमंडळाने जे उपेक्षित,दुसऱ्यावर अवलंबून असलेल्या दिव्यांग,वृध्द, निराधाराना आधार देणे गरजेचे असतिना अर्थसंकल्प बजेट मध्ये तरतूद केली नाही वारंवार आश्वसनाचे गाजर दाखविले आहे.
आपले राज्य देशात महसुली मध्ये नंबर वन असताना सुद्धा दिनदुबळ्याना मानधनात वाढ का होत नाहि,आपल्या शेजारच्या राज्य आंद्राप्रदेश सरकारने दिव्यांगाना दरमहा सहा हजार रू वाढ केली त्याच प्रमाणे आपल्या सरकारने दिव्यांग, वृध्द निराधाराना मानधनात वाढ करून आधार दिला पाहिजे पण तसे सरकारने केले नाही.
लोकप्रतिनिधी ने थोडा विचार केला पाहिजे दरमहा दिड हजार रुपयात ते जीवन कसे जगत असतील त्यांना चहासाठी दोन वेळा दुध, साखर पती तरी दररोज मिळणाऱ्या पन्नास रू.मिळते काय? आपले जिवन जगण्यासाठी किमान दोन वेळा जेवून दोन वेळा चहासाठी किती खर्च येत असेल ते कसे जगत असतील ते लोकप्रतिनिधी कळत असताना दिनदुबळ्यासाठी का बरे असे वागत असतील तसेच आपण मानवि दृष्टिकोनातून विचार का बरं करत नसतील ते स्व:तासाठी सत्तेचा उपयोग करून लोकप्रतिनिधी आमदार, खासदारांचे मानधन वाढते, कर्मचाऱ्यांना पगारी महागाईमुळे वाढतात तसेच उपेक्षित समाजाला न्याय मिळावा म्हणुन दिनदुबळे मतांचे शिक्के देऊन उपेक्षिताला न्याय मिळावा म्हणुन प्रतिनिधी पाठवतात तेच प्रतिनिधी दिनदुबळ्याचा विचार करीत नसल्यामुळे मतदान न करता दिनदुबळे घरी बसतात तेव्हा शासन, प्रशासन मतांची टक्केवारी वाढावी म्हणून दिव्यांगाच्या घरी मतदान केंद्र नेले जाते. त्यावेळि आठवण येते तरी मतदानाची टक्केवारी वाढत नाही .
आता दिव्यांग, वृध्द निराधार,जागे झाले पाहिजे आपल्या हक्कासाठी संघटितपणे संघर्षाशिवाय आपली शक्ती निर्माण केल्याशिवाय हे लोकप्रतिनिधी आपला विचार करत नसल्यामुळे महाराष्ट्रतील सोळा संघटनेने उपेक्षित दिव्यांग, वृध्द निराधारांच्या मानधनात वाढ
व ईतर सवलतीची अधिवेशनात तरतुद करण्यात यावी म्हणून दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या नेतृत्वाखाली शासनाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी दि.१० जुलै २०२४ दिव्यांगाचा मंत्रालय घेरावा आंदोलनात दिव्यांग, वृध्द निराधार बांधवानी सहभागी व्हावे असे आव्हान दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर, महाराष्ट्र सचिव मनोज कोटकर, मराठवाडा अध्यक्ष सुधाकर पिलगुंडे,जि.अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले, जि.सचिव अनिल रामदिनवार,जि.संपर्क प्रमुख नागोराव बंडे,जि.ऊप अध्यक्ष राजु भाऊ शेरकुरवार,उमेश भगत, मगदुम शेख, दादाराव कांबळे,दिंगाबर लोणे, गजानन वंहिदे, दत्तात्रय सोनकांबळे, राजेश सुकळकर, बबिता मारबते,रेवा राठोड,हेमसिंग आडे इत्यादी पदाधिकारी यांनी केले.

173 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.