*प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा* *पिंपरी चिंचवड, पुणेच्या वतीने केले होते आयोजन*
पिंपरी चिंचवड : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवडच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका पत्रकार कक्षामध्ये नुकताच जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
यावेळी ज्या कर्तुत्ववान महिलांनी अपारकष्ट करुन कुटुंबाचे संगोपण, पालन पोषण केले, मुलांना उच्च शिक्षण देवुन घडवले, सामजिक क्षेत्रात उत्तम कार्यरत असणाऱ्या कर्तुत्ववान महिलांचा साडी, पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
यामधे शांताबाई कांबळे, सुनिता महाडीक, कामना भोसले, चंद्रकला भोसले, शिवानी पाटेकर, दीक्षा चाबुकस्वार आदी कर्तुत्ववान महिलांनी कष्ट करत कुटुंबाची जबाबदारी तसेच मुलांना उत्तम शिक्षण देत आदर्श माता सन्मान मिळवला.
यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संगणक अधिकारी उज्वला करपे, कार्यकारी अभियंता प्रेरणा शिंकर, कार्यकारी अभियंता संध्या वाघ, कार्यकारी अभियंता जहिरा मोमीन डॉ. संगीता वुके यांच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.
तसेच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पुणे पिंपरी चिंचवडच्या वतीने प्रमुख पदाधिकारी महिला, सहा आयुक्त सुषमा शिंदे, महिला पत्रकार माधुरी कोराड, पत्रकार अर्चना मेंगळे आदी महिला पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. तसेच सर्व स्तरातील महिलांचे स्वागत करुन महीला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रमुख मान्यवरांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ शहरअध्यक्षा सौ मंदा बनसोडे, उपाध्यक्षा उषा लोखंडे, सचिव निर्मला जोगदंड यांचाही सन्मान केला.
महीला दिनाबद्दल बोलताना महिलांचे कोणत्याही क्षेत्रातील यश सहज नसते, कुटुंब आणि आपले क्षेत्र सांभाळताना महिलांनाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात उतरावे लागते, स्त्रीचा सन्मान जर कोणाला करता येत नसेल तर करू नये, मात्र अवहेलना करण्याचा कोणालाही अधिकार नाही. या विचाराने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
मात्र महीला दिनाच्या दिनी महिलांनी त्या महान व्यक्तीचा उल्लेख करण्यास त्या विसरल्या नाहीत, जर ज्योतिबा फुले नसते, तर सावित्री माई घडल्या नसत्या, माता जिजाऊमुळे शिवाजी महाराज घडले, स्त्री सन्मान मिळाला, डॉ. बाबसाहेब अंबेडकर नसते तर संविधानिक हक्कापासून स्त्रिया वंचित राहिल्या असत्या. अशा महान मानवांचे आणि फुले, शाहू आंबेडकर यांच्यासह ज्या महापुरुषानी ‘स्त्रीयांच्या उद्धारासाठी झटले त्या सर्व महापुरुषाचे आभार मानन्यात आले. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे कौतुक करत सर्व मान्यवरांनी आभार मानले.