किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

*पत्रकारावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा* *प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन*

लातूर : पत्रकारावर प्राणघातक हल्ला करणाऱ्यावर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत तात्काळ गुन्हा नोंद करावा यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हा शाखा लातूरच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
काटगाव तालुका लातूर येथील जिल्हा परिषद शाळेतील काही विद्यार्थ्यांना इन्स्पेक्शनच्या नावाखाली अनेक वेळा संडास बाथरूम साफ करुन घेतल्याचा प्रकार घडला असून सदर प्रकरण विद्यार्थ्यांच्या पालकावर दबाव आणून मिटवण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा जाब विचारण्यासाठी विद्यार्थ्यांचे पालक व क्राईम रिपोर्टरचे संपादक धनराज वाघमारे गेले असता मुख्याध्यापक यांनी अरेरावीची भाषा करून गावची इज्जत बाहेर काढतोस का म्हणून मुख्याध्यापक व गावातील गावगुंडांनी पत्रकारावर प्राणघातक हल्ला केला. पत्रकार धनराज वाघमारे हे सिव्हील हॉस्पिटल लातूर येथे ॲडमिट आहेत.
सदर घटनेची तात्काळ चौकशी करून पत्रकार धनराज वाघमारे व कॅमेरामन यांच्यावर प्राण घातक हल्ला करणाऱ्या गावगुंडावर तात्काळ पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करावा.
पीडित मुलींकडून अनेकवेळा संडास बाथरूम साफ करून घेऊन शिक्षण विभागास काळे फासणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षकांना तात्काळ सेवेतून निलंबित करून फौजदारी कारवाई करावी, पीडित मुलीच्या पालकास दडपशाही करत जबरदस्तीने आमची तक्रार नाही असा जाब नोंदवून घेणाऱ्या वरिष्ठ अधिकारी (बी ओ) यांना सेवेतून तात्काळ निलंबित करावे, मुलीच्या पालकांची तक्रार नोंदवून न घेणाऱ्या लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक व भाग जमादार यांची तात्काळ बदली करावी, दहशत माजवणाऱ्या गावगुंडावर एम पी डी ए अंतर्गत कारवाई करावी, गावगुंडांनी दडपशाहीखाली ठेवलेल्या पालक व मुलींचे पुनर्वसन करावे.
आदी मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी लातूर, पोलीस अधीक्षक लातूर, व सीईओ यांना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हा शाखा लातूरच्या वतीने देण्यात आले.
या निवेदनावर जिल्हाध्यक्ष लहूकुमार शिंदे, उपाध्यक्ष महादेव पोलदासे, प्रसिद्धीप्रमुख संतोष सोनवणे, ज्येष्ठ पत्रकार शिरीषकुमार शेरखाने, कार्याध्यक्ष रियाज शेख, ॲड. राजकुमार दाभाडे, संपादक दिनेश गिरी, आनंद दनके, लिंबराज पन्हाळकर, अमोल इंगळे, साईनाथ घोणे, अमोल घायाळ, नेताजी जाधव, कृष्णा कोल्हापुरे, नरसिंगे व्यंकटेश, अहिल्या कस्पटे, विजय गायकवाड, कावेरी विभुते आदींच्या सह्या आहेत.

210 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.