चिखली खुर्द येथे जिवती तालुका भूमीहिन शेतकरी बचाव संघर्ष समितीच्या सदस्यांचा युवक मंडळातर्फे जाहीर सत्कार.
जिवती -6-चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना व कष्टकऱ्यांना त्यांच्या मालकी हक्काचे जमिनीचे पट्टे मिळाले पाहिजे यासाठी व अन्य मागण्या घेऊन जिवती तहसील कार्यालय समोर नऊ दिवस अन्नत्याग आमरण उपोषण तालुका भूमिहीन शेतकरी बचाव संघर्ष समितीतर्फे करण्यात आले. या समितीत सर्वपक्षीय सामाजिक कार्यकर्ते यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन अन्न त्या ग आमरण उपोषणाला बसलेले होते त्या उपोषणकर्त्यांचा चिखली खुर्द युवक मंडळ व गावकऱ्यांतर्फे नवीन वर्षानिमित्त जाहीर सत्कार करण्यात आला आहे.
त्यात श्री सुग्रीव गोतावळे श्री लक्ष्मण मंगम,सुदाम राठोड, शब्बीर जागीरदार, विनोद पवार, प्रेम चव्हाण ,विजय गोतावळे दयानंद राठोड ,मुकेश चव्हाण यांचा समावेश होता गावकऱ्यांनी , युवकांनी मोठ्या उत्साहात त्यांचे सत्कार करण्यात आला.
एफ झेड क्लासेसचे संचालक शिक्षण प्रेमी श्री सय्यद जुबेर यांच्यासह त्यांच्या सर्व मित्रमंडळी व गावकऱ्यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे स्वागत केले यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक श्री दत्ता पाटील बोळगीर उस्मान खान पठाण, रामचंद्र केदासे पाटील. कानोरे मामा तसेच नितेश ढगे रफिक पठाण, गोविंद दुबले, पंकज केदासे, संग्राम ढगे, चंद्रभान केदासे, समित सय्यद, मुनीर पठाण, जनार्धन कनोरे, मोहदीन पठाण, सटवाजी कानोरे, लहू मर्देवाड, लक्ष्मण पोले इब्राहिम शेख, उस्मान खान, भाऊसाहेब देवकते, तिरुपती सलगर , सय्यद, अमीर पठाण, प्रशांत केदासे ,बाबू कानोरे, द्रुपद जानकर खंडेराव सलगर, गोविंद परकड ,मल्हारी कानोरे, रजाक शेख, परमेश्वर परकड इत्यादी गावातील सगळी मंडळी व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपोषणकर्त्यांनी विचार व्यक्त करताना हा सत्कार म्हणजे येणाऱ्या काळामध्ये तालुक्यातील समस्या सोडवन्या साठीची मिळणारी ऊर्जा व ताकद आहे व उत्साहा असा जनतेने प्रेम दाखवल्यास आम्हाला काम करण्याची प्रेरणा देणारा असल्याचे सर्व उपोषणकर्त्यांनी मत व्यक्त केले व पुढच्याही काळात समस्या मार्गी न लागल्यास तालुक्यातील जनतेने खंबीरपणे पाठीशी उभे राहावे, आम्ही आपल्या सहकार्याने व ताकदीने समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेऊ असे मान्यवराने विचार व्यक्त केले या कार्यक्रमाचे संचलन श्री दुबले यांनी केले तर आभार केदासे यांनी मानले.