वक्तृत्व स्पर्धेच्या यशात दिवसेंदिवस गुणवत्तापूर्ण वाढ होत आहे.-अभि.प्रशांत ठमके यांचे वक्तव्य; महात्मा फुले विद्यालयात वक्तृत्वस्पर्धा उत्साहात संपन्न
किनवट, दि.२२ (प्रतिनिधी): खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. यंदा मराठा आरक्षणासोबतच धनगर तसेच ईतर समाजाच्या आरक्षण, शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचे आलेले संकट या पार्श्वभूमीवर खासदार हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाढदिवसानिमित्त होणारे सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले. परंतु मागील वर्षापासून विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेली निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत मागील वर्षापेक्षा विद्यार्थी संख्या जास्त आहे. या स्पर्धेचे उद्घाटन करताना स्पर्धेत सहभागासोबतच गुणवत्तेमध्ये सुद्धा वाढ झाली, हे या स्पर्धेचे खरे यश आहे. असे वक्तव्य मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अभि.प्रशांत ठमके यांनी येथे केले.
येथील महात्मा फुले माध्यमिक विद्यालयात शुक्रवारी (दि. २२) खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कयाधू-पैनगंगा महोत्सव समिती अंतर्गत हिंदुहृदयसम्राट स्व. श्री. बाळासाहेब ठाकरे स्मृती खासदार चषक भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख संतोष माने यांनीही स्पर्धेला शुभेच्छा देताना वक्तृत्व स्पर्धेसारखे मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देणारे उपक्रम अभिनंदनीय आहे असे प्रतिपादन केले या प्रसंगी किनवट शिवसेना तालुका प्रमुख बालाजी मुरकुटे, माहूर तालुका प्रमुख सुदर्शन नाईक,शहर प्रमुख सुरज सातुरवार, माहूर शहर प्रमुख विकास कपाटे, माजी जि प सदस्य संभाजी लांडगे,दिशा समिती सदस्य मारोती सुंकलवाड, माजी उपसभापती गजानन कोल्हे, मनोज तिरमनवार, सुरेश घुमडवार, कपिल रेडी, हनुमंत मुंडे, हिरासिंग चव्हाण, संतोष दुबे,मनीषा टिपकर, रेणुका जयस्वाल, ज्ञानेश्वर गुजलवाड, गोपाळ नाईक, मेरसिंग पवार, अरविंद जयस्वाल, विलास टिपकर,चंद्रकांत जायभाये, घनश्याम कराळे, नागेश चंद्रे, अविनाश चव्हाण, राजू शिरपूरे, रोहन पिसारीवार, सोनू माने, अजित बेले,साई पालेपवाड समीर जायभाये, अरविंद कदम, बळीराम शिंदे, विक्रांत दगुलवार, शेख अजीज, दासू गावत्रे,अशोक जाधव, आकाश टाक,सुखदेव सलाम, मोहसीन शेख, गोपाळ नाईक, दिलीप भोसले, संदीप वाठोरे, अजय गिरी, देविदास देशमुखे याची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना राजश्री पाटील म्हणाल्या की, मागील वर्षी स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कुठेतरी आत्मविश्वासाची कमी दिसून येत होती. या वर्षी मात्र ही मुले अतिशय अभ्यासपूर्ण विषयाला धरुन बोलत आहेत. त्यांच्यातील आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. हे खरे असले तरी, स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी प्रा. महेश अचिंतलवार यांनी स्पर्धा संपल्यानंतर देखील विद्यार्थ्यांना कसे बोलावे, विषयाची मांडणी कशी करावी, आवाजातील चढ उतार, संदर्भ कसे आणि कधी द्यावेत या सातत्याने मार्गदर्शन केल्यामुळेच आज या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास उचावल्याचे दिसून आल्याचे त्या म्हणाल्या. विद्यार्थ्यांनी हातालील मोबाईलचा वापर सेल्फी काढणे, रिल बनवणे या पुढे जाऊन अभ्यासासाठी देखील मोबाईलचा वापर केला पाहिजे. असा मोलाचा सल्ला राजश्री पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.
तत्पूर्वी सहसंपर्क प्रमुख संतोष माने,किनवट शिवसेना तालुका प्रमुख बालाजी मुरकुटे, शहर प्रमुख सुरज सातुरवार, दिशा समिती सदस्य मारोती सुंकलवाड स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेत सर्वप्रथम महेक शेख कयुम, व्दितीय राजश्री राठोड, तृतीय साक्षी चव्हाण, उत्तेजणार्थ – १ स्नेहल – जाधव, उत्तेजणार्थ -२ पायल राठोड या विद्यार्थ्यांनी विजेतेपद पटकावले, विजेत्या स्पर्धकांना शिवसेना संपर्क प्रमुख संतोष माने यांच्याहस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. या वेळी सुरज सातुरवार, सुदर्शन नाईक, विकास कपाटे, संभाजी लांडगे, सुदर्शन पाटिल, महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अभि प्रशांत ठमके, महिला आघाडीच्या ज्योती टीपकर, रेणूका जयस्वाल, विधानसभा संघटक, हनुमंत मुंडे संतोष दुबे, प्रकाश गिरी, ज्ञानेश्वर गूजलवाड, अरविंद जयस्वाल, विलास टीपकर हे उपस्थितीत होते.
स्पर्धेसाठी प्रा. महेश अचिंतलवार, अॅड. समीर सोहेल, गोविंद अंभोरे यांनी परीक्षक म्हणून काम बघितले. आशिष साडेगावकर यांनी सुत्रसंचालन केले, स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रपाल सरोदे, सुनिल गरड, किरन येरमे, मारोती जाधव, आकाश शिंदे, संस्थेचे बैसठाकूर, डांगे, मुनेश्वर, जुनघरे सर यांनी परिश्रम घेतले.