किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

किनवट येथील जिजामाता चौकात इंडियाआघाडी व मित्रपक्षांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत केले निषेध आंदोलन

किनवट प्रतिनिधी
लोकसभेतील खासदारांच्या निलंबन प्रकरणी इंडिया आघाडी व मित्र पक्षाच्या वतीने देशभरात रोष व्यक्त करण्यात येत असून 22 डिसेंबर रोजी किनवट येथील जिजामाता चौकात इंडियाआघाडी व मित्रपक्षांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन केले असून खासदारांचे निलंबन मागे घ्यावे,कापसाची भाववाढ करावी जुलै महिन्यातील अतिवृष्टीचे मंजूर अनुदान त्वरित वितरित करावे तसेच पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना त्वरित अदा करावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

संसदेवर झालेल्या भ्याड हल्यानंतर या घटनेचा जाब विचारणाऱ्या विरोधी पक्षाच्या 140 पेक्षा अधिक खासदारांना गोंधळ घातल्याच्या कारणावरून निलंबित केले.या निलंबनाविरोधात इंडिया आघाडी व मित्रपक्षा कडून जोरदार विरोध केला जात असून दि 22 डिसेंबर रोजी किनवट येथील जिजामाता चौकात दु 12 वा महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना, कम्युनिस्ट यांच्यासह मित्र पक्षांनी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन केले आहे. लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या केंद्र सरकारचा जाहीर निषेध अशा आशयाचे फलक झळकावत खासदारांचे निलंबन त्वरित मागे घ्यावे कापसाचे भाववाढ करावी अतिवृष्टीचे अनुदान त्वरित वितरित करावे मंजूर पिकविम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात त्वरित जमा करावी अशा विविध मागण्या यावेळी केल्या आहेत.
कॉ अर्जुन आडे, उपसभापती राहुल नाईक, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के मूर्ती जयपाल जाधव, अतुल दर्शनवाड यांनी मोदी सरकारच्या हिटलरीवृत्तीचा तीव्र शब्दात समाचार घेतला. भाजप सरकारला सत्तेचा अहंकार चढला असून हे सरकार जाती-धर्माच्या नावाखाली विकासाला मूठमाती देऊन शोषित वंचित शेतकरी शेतमजूर व कामगारांची पिळवणूक करत असल्याचा आरोप करत या सरकारला खुर्चीवरून खाली खेचले पाहिजे असे आवाहन केले.
या निषेध आंदोलनात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड, कॉ अर्जुन आडे, सभापती गजानन मुंडे, बाजार समितीचे संचालक अनिल पाटील कराळे,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष के मूर्ती उपसभापती राहुल नाईक राष्ट्रवादीचे युवक तालुका अध्यक्ष बालाजी बामणे आदिवासी नेते जयवंत वानोळे माजी उपसरपंच प्रवीण म्याकलवार शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अतुल दर्शनवाड,अजित साबळे, श्रीराम कांदे,बंटी जोमदे,अजय कोवे,शेख सलीम शेख मदार, शेख सरुभाई,राजू सुरवसे मा आमदार प्रदीप नाईक यांचे स्वीय सहायक रोहिदास जाधव अंबाडीचे सरपंच गिरिधारी जाधव,जयपाल जाधव,कॉ स्टॅलीन आडे, कॉ जनार्दन काळे, कॉ मोहन जाधव, माजी उपनगराध्यक्ष अभय महाजन, बाळू पवार,गंगाधर बट्टलवाड,गोविंद धुर्वे,सुदर्शन गवळे ज्ञानेश्वर सिडाम, प्रमोद मुनेश्वर, दत्ता पवणे,अमोल जाधव,सिद्धांत नरवाडे, अर्शद खान, शेख अक्रम मनोज श्रीरामे, जीवन राठोड,संतोष मिरासे, शेख पाशा, रवी दांडेगावकर, रामेश्वर चव्हाण, रामदास राठोड,अश्विन पवार, अमेर भाई,वसंत राठोड, नवीन गालेवार, कोमल भवरे, साई जाधव,शुभम पांचाळ, मोनू गायकवाड, संग्राम शेवाळे यांच्यासह मित्रपक्षातील नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

703 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.