आंबडी येथील दोन लहान मुलींचा बंधाऱ्याचे शेत तळ्याच्या पाण्यात बुडून मृत्यू.
किनवट/प्रतिनिधी: दि.06/11/2023 रोजी वेळ 10:12 वा.प्रदीप शंकर उमरे रा.आंबाडी ता. किनवट जि.नांदेड यांच्या दोन्ही मुली 1) वैष्णवी प्रदीप उमरे वय 14 वर्षे व 2) परिधी प्रदीप उमरे वय 10 वर्षे ह्या शेतात गाईंसाठी गवत आणण्यासाठी गेले असता त्या बराच वेळ झाला तरी त्या घरी आल्या नाहीत म्हणून त्यांनी त्यांचा बंधाऱ्याचे शेततळ्या जवळ शोध घेतला असता त्यांचे चपला दिसल्याने गावातील लोकांनी पाण्यात उतरून शोध घेतला असता त्या दोघी पाण्यात बुडून मरण पावल्याचे मिळून आल्या.
प्रदीप शंकर उमरे वय 40 वर्षे व्यवसाय शेती व मजुरी रा.आंबाडी ता. किनवट जि.नांदेड यांनी दिलेल्या माहितीनुसार पो.स्टे. किनवट येथे आमृ /नंबर 41/2023 कलम 174 सीआरपीसी प्रमाने अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला असून पुढील चौकशी सहाय्यक पोलीस निरीक्षक वाठोरे हे करतील.
घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.