“सुंदर माझे कार्यालय” उपक्रमासाठी गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने यांनी मिळविला रेणूका पतसंस्थेकडून 11 हजाराचा लोकवाटा
किनवट : कुठलाही शासकीय निधी नसतांना लोकसहभागातून “सुंदर माझे कार्यालय” उपक्रमांतर्गत कार्यालयाची अंतर्गत बाह्य आकर्षक रंगरंगोटी केली असून व्हरांड्यात पेवर ब्लॉक टाकण्यासाठी सहभागाचे आवाहन गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने यांनी करताच येथील रेणूका सहकारी शिक्षक पतसंस्थेने आपलाही सहभाग असावा म्हणून गट शिक्षणाधिकारी कार्यालयास 11 हजाराचा लोकवाटा दिला.
विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील ” सुंदर माझे कार्यालय ” उपक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी जिल्ह्यात गतीने चालना दिली आहे. गट विकास अधिकारी सुभाष धनवे, शिक्षणाधिकारी (प्रा) प्रशांत दिग्रसकर व शिक्षणाधिकारी (मा) माधव सलगर यांच्या मार्गदर्शनाखाली गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने यांनी येथील गट शिक्षणाधिकारी कार्यालयाचे रुपडे बदलून टाकले आहे. जुन्या कळकट मळमट भिंतींना आकर्षक रंग लावला असून त्यावर प्रेरणादी सुविचार लिहिले आहेत. तसेच बाह्य भिंतीवर या तालुक्याच्या आदिवासी-बंजारा लोकसंस्कृतीसह विविध संदेशपर आकर्षक चित्रे रेखाटली आहेत. याकरिता शासनाचा कुठलाही निधी न वापरता केवळ लोकसहभागातून ही कामे केली आहेत. व्हरांड्यात पेवर ब्लॉक टाकण्याकरिता सहभागाचे आवाहन गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने यांनी करताच येथील रेणूका सहकारी शिक्षक पतसंस्थेने आपलाही सहभाग असावा म्हणून गट शिक्षणाधिकारी कार्यालयास 11 हजार रुपये निधी लोकवाटा म्हपून दिला.
यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी संजय कराड,शिक्षण पतपेढी नांदेडचे तज्ज्ञ संचालक तथा म.रा.शिक्षक परिषदचे जिल्हा कार्याध्यक्ष नरसिंग यंड्रलवार, म.रा.शिक्षक परिषदचे जिल्हा उपाध्यक्ष रवी नेम्माणीवार, रेणूका सहकारी शिक्षक पतसंस्था मर्यादित ता. किनवटच्या अध्यक्षा वर्षाराणी नेम्माणीवार, सचिव शरद कुरुंदकर, उपाध्यक्ष सचिन चव्हाण, संचालक रविंद्र जाधव, संतोष दासरवार, गजानन निळकंठवार, सुधाकर दहिफळे, किशन वानोळे, प्रदीप कुडमेथे, मारोती नागरगोजे, वसंत राठोड, विजयालक्ष्मी तिरमनवार, वरिष्ठ सहायक गिरीधर नैताम, केंद्रिय मुख्याध्यापक राम बुसमवार, राजेश्वर जोशी, एस.एन. ब्राह्मण आदिंची उपस्थिती होती.
” अनेक शाळांचे मुख्याध्यापक शाळेसाठी लोकवाटा मिळवितात हे सर्वांना ज्ञात आहे. परंतु मोठ्या खुबीने किनवटचे गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने यांनी सुंदर माझे कार्यालय उपक्रमासाठी लोकवाटा मिळवून कार्यालयाची केलेली देखणी सजावट ईतरांसाठी अनुकरणीय आहे. कौतुकास्पद आहे.
– प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी (प्रा), जि.प., नांदेड