किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

*कै.स्व.शंकरराव चव्हाण यांच्या 103व्या जयंतीनिमित्त त्यांच्या 103 प्रतिमांचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते वाटप *रास्त भाव धान्य दुकानदार सेल कॉंग्रेस कमिटी नांदेडचा उपक्रम

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.16.रास्त भाव धान्य दुकानदार सेल कॉंग्रेस कमिटी नांदेड,जिल्हा नांदेडच्यावतीने भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री स्व.डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे कुसुमताई चव्हाण सभागृह येथे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

रास्त भाव धान्य दुकानदार सेल कॉंग्रेस कमिटी नांदेड,जिल्हा नांदेडच्या वतीने स्व.डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या 103व्या जयंतीनिमित्त सेलचे जिल्हाध्यक्ष अशोक जयंतराव एडके यांच्या पुढाकारातून 103 प्रतिमांचे वितरण करण्यात आले.

या प्रसंगी माजी मंत्री डी.पी.सावंत, आ.मोहन हंबर्डे,माजी महापौर प्रतिनिधी ऍड.निलेश पावडे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश सरचिटणीस प्रफुल्ल सावंत, युवक कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.विठ्ठल पावडे,युवक कॉंग्रेसचे उत्तर विधानसभा अध्यक्ष विक्की राऊतखेडकर,नांदेड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष मंगेश कदम, माजी नगरसेवक सुभाष रायबोले, संदीप सोनकांबळे, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष अजय एडके आदी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी सेलचे जिल्हाध्यक्ष अशोक एडके,शाहुराज गायकवाड,अब्दुल सलीम, अशोक गायकवाड, सादीक मरखेलकर,बळवंत सूर्यवंशी, मो. मुजाहीद,अब्दुल कलीम,सुभाष काटकांबळे,जुनेदभाई, नदीमभाई,सुनील पटकोटवार, साजीद भाई, शहनवाजाई, संदीप पवार आदींनी परिश्रम घेतले.अशी माहिती
बळवंत सूर्यवंशी
जिल्हा कार्यकारिणी सदस्य
रास्त भाव धान्य दुकानदार सेल कॉंग्रेस कमिटी नांदेड,यांनी आमच्या प्रतिनिधीनी दिली आहे.

136 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.