किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

एक जून रोजी सीटूच्या घरेलू महिला कामगारांचा म.फुलेंना अभिवादन करून कामगार आयुक्त कार्यालयास घेराव /ठाण मांडून बसलेल्या व कार्यकाळ संपलेल्या कामचुकार अधिकारी – कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करा

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.27.समाजामध्ये अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना करून जीवन जगणारा कामगार म्हणजे घरेलू कामगार आहे.मोठ्या प्रमाणात व प्रामुख्याने घरेलू कामगार म्हणून महिलांचाच समावेश आहे. त्या महिलांना सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात सोहार्दपुर्ण वागणूक दिली जात नाही.

अशा अनेक तक्रारी संघटनेकडे प्राप्त झाल्या असून वशीलेबाजीने एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेले अधिकारी – कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी हे घरेलू कामगार महिलांना अपमानास्पद वागणूक देत असून नोंदणी व नूतनिकरण करून घेण्यास उदासीनता दाखवीत आहेत.
सीटू संलग्न ” नांदेड जिल्हा घर कामगार संघटना “ही नांदेड जिल्ह्यात एकमेव संघटना शासन मान्य व नोंदीत संघटना असून या संघटनेने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर अनेक यशस्वी मोर्चे आंदोलने करून संघटित आणि असंघटित कामगारांना न्याय मिळवून दिला आहे.

घरेलू कामगारांच्या विविध मागण्यासाठी एक जून रोजी सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयाला घेराव घालण्याची रीतसर नोटीस दि.२३ मे रोजी देण्यात आली असून त्या निवेदनाच्या प्रति राज्याचे कामगार मंत्री ना.सुरेश खाडे,कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य मुबंई,विभागीय महसूल आयुक्त औरंगाबाद,जिल्हाधिकारी नांदेड,पोलीस अधीक्षक नांदेड तसेच पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शिवाजी नगर आदींना देण्यात आल्या आहेत.
खरे पाहिले तर नांदेड येथील कामगार कार्यालय हे नेहमीच बोगस कामगारांच्या नोंदी करणे आणि बोगस लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यात धन्यता मानत आहे म्हणून नेहमीच चर्चेत असते.
जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थाना मागील कामगार कार्यालयाच्या आजू बाजूला बोगस नोंदणी करून देणारे अनेक मल्टिसर्व्हिसेस दुकाने थाटली असून हे सर्व प्रकार अधिकाऱ्यांच्या आशिर्वादामुळे बिनदिक्कतपणे राजरोस सुरु आहेत. हजारो रुपये घेऊन लेबर कार्ड काढून देणाऱ्या टोळ्या जिल्ह्यात सक्रिय असून लेबर कार्डचा गैरवापर करून विविध शासकीय लाभ आणि अनेक सुविधा बोगस लाभार्थी घेत आहेत.नोंदीत कामगारांना आरोग्य विमा,मुलांना शिष्यवृत्ती, घरकुल,सानुग्रह अनुदान अशा अनेक योजनांचा कायदेशीर लाभ मिळत असतो.
बांधकाम क्षेत्रात तर सखोल चौकशी केल्यास हजारो कामगार बोगस आहेत हे सहज सिद्ध होईल.ठेकेदार आणि ग्रामसेवक यांचे बोगस शिक्के वापरून प्रमाणपत्र तयार करून नोंद केली जात असून महापालिका क्षेत्रातील सही व शिक्के देखील मोठया प्रमाणात बोगस तयार केले जात आहेत.हे सर्व प्रकार संगणमताने केले जात आहेत.
ह्या खऱ्या खुऱ्या कामगार विरोधी कृत्याचा पर्दाफास होणे आवश्यक आहे.

मागील महिन्यात सीटू कामगार संघनेने जिल्हाधिकारी कार्यालया समोर अखंड पन्नास दिवस आंदोलन केले असून जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयातील कार्यकाळ संपलेल्या अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या तात्काळ बदल्या करून वशीलेबाजीने ठाण मांडून बसलेल्याना कार्यमुक्त करावे ही मागणी करण्यात आली आहे.
शासनाने घोषित केलेले दहा हजार रुपये घरेलू कामगारांच्या बँक खात्यात टाकण्यात यावेत.
गेल्यावर्षी नोंद असलेल्या सरसगट कामगारांचे नूतनिकरण करून घ्यावे.युनियनच्या सभासदांचे अर्ज युनियनने लेखी स्वरूपात विनंती केल्यास ते स्वीकारण्यात यावेत.घरेलू कामगारांना राज्य आणि केंद्र शासनाच्या सर्व सवलती देण्यात याव्यात.घर मालकाच्या आधार कार्डची सक्ती करु नये.दि.१जून रोजी किमान सहा टेबल लावून आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध ठेऊन नोंदणीसाठी आलेल्या सर्व कामगारांची नोंद करावी.आदी मागण्या करण्यात येत आहेत.
या आंदोलनाचे नेतृत्व नांदेड जिल्हा घर कामगार संघटनेच्या अध्यक्षा कॉ.करवंदा गायकवाड, सरचिटणीस कॉ.लता गायकवाड आणि कार्याध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड हे करीत आहेत.
आंदोलनाची जोरदार तयारी सुरु असून आंदोलनाच्या दिवशी नोंदणी करण्यात येणार आहे.

तरी धुणेभांडी,सवयंपाक आणि घर काम करणाऱ्या सर्व महिला पुरुष कामगारांनी एक जून रोजी सकाळी ११-०० वाजता महात्मा फुले पुतळा आयटीआय येथे जमावे. म.फुले यांना अभिवादन करून पेट्रोल पंपा समोरील लेबर ऑफिस,उद्योग भवन नांदेड येथे घेराव आंदोलन करण्यात येईल.
तसेच अर्ज सादर करण्यासाठी लागणारे अवश्यक सर्व कागदपत्रे सोबत घेऊन यावे.असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. अशी माहिती सीटूचे जनरल सेक्रेटरी तथा संघटनेचे कार्याध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.

अशी माहिती कॉ.गंगाधर गायकवाड जनरल सेक्रेटरी CITU नांदेड जिल्हा कमिटी तथा कार्याध्यक्ष नांदेड जिल्हा घर कामगार संघटना (CITU)यांनी आमच्या प्रतिनिधीना दिली आहे.

88 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.