राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने केले आहे आयोजन
लातूर : महाराष्ट्रातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारा आय एस ओ मानांकन प्राप्त पत्रकारांचा एकमेव संघ असून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघाच्या वतीने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील गुणवंतांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याकरिता महाराष्ट्र राज्यात वैद्यकीय, पत्रकारिता, विधी, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, उत्कृष्ट जिल्हा, उत्कृष्ट तालुका, उत्कृष्ट पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, आदर्श सरपंच, आदर्श तलाठी, आदर्श ग्रामसेवक, उत्कृष्ट पोलीस, उत्कृष्ट सफाई कामगार, उद्योग / व्यापार / व्यवसाय, साहित्य, चित्रपट, तृतीय पंथी आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. त्याकरिता लहुकुमार शिंदे जिल्हाध्यक्ष लातूर मो. 9922238952 / 9284618932 वैशालीताई पाटील जिल्हा महिला अध्यक्षा लातूर मो. 7823860782, संजय राजुळे, जिल्हा संघटक लातूर मो. 9923221900 या व्हॉट्सॲप नंबरवर किंवा satyapolicetimes@gmai.com / suvarnayug.news@gmail.com या मेलवर राज्यस्तरीय पुरस्कारासाठी दिनांक २६ मे २०२३ पर्यंत विहित नमुन्यात प्रस्ताव पाठवावा असे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
प्रस्ताव सादर करताना त्यात संपूर्ण नाव, जन्मतारीख, संपूर्ण पत्ता, मो न, ईमेल आयडी, शैक्षणिक अर्हता, कोणत्या क्षेत्रासाठी प्रस्ताव सादर केला आहात?, आपण करीत असलेला व्यवसाय, आपण ज्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले आहे त्याच्या झेरॉक्स प्रती सोबत पाठवणे, यापूर्वी कोणते पुरस्कार मिळाले आहेत का? असल्यास झेरॉक्स प्रती, 2022 मध्ये केलेले उल्लेखनीय कार्य (असल्यास झेरॉक्स प्रती जोडणे),आपली वैयक्तिक माहिती (बायोडाटा झेरॉक्स प्रत) ही माहिती वेळेत पाठवावी. आपली निवड झाल्यास आपणास फोनद्वारे कळवले जाईल. दिनांक २६ मे,२०२३ नंतर आलेल्या प्रस्तावाचा विचार केला जाणार नाही. चार सदस्यीय समितीचा निर्णय अंतिम राहील. असे संघाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी डी. टी. आंबेगावे संस्थापक अध्यक्ष, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य मो ९२७०५५९०९२ / ७४९९१७७४११, लहुकुमार शिंदे, जिल्हाध्यक्ष लातूर मो. ९९२२२३८९५२ / ९२८४६१८९३२, वैशालीताई पाटील जिल्हा महिला अध्यक्षा लातूर मो.७८२३८६०७८२, संजय राजुळे जिल्हा संघटक लातूर मो.९९२३२२१९०० या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांनी आवाहन केले आहे.