सर्पदंशाने भंडारवाडीच्या एका युवतीचा मृत्यू
किनवट ता.प्रतिनिधी: मयत कोमल रामदास पेदेवाड वय 14 वर्ष रा. भंडारवाडी तालुका किनवट ही गावातील यशवंतराव नागरगोजे यांचे शेतात मक्का काढण्यासाठी गेली असता तिचे उजव्या पायाचे घोट्यावर कोणतेतरी विषारी सापने चावा घेतल्याने स. द. गोकुंदा येथे शरीक केले व तेथुन शासकीय रुग्णालय, विष्णुपुरी येथे पुढील उपचार कामी रेफर केले असता दि.23/04/2023 रोजी 17.30वा. चे सुमारास शासकीय रुग्णालय, विष्णुपुरी नांदेड येथे निधन झाल्याचे आर. एस. लोंढे, वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय, गोकुंदा यांनी दि 26/4/2023 रोजी शासकीय रुग्णालय, विष्णुपुरी, नांदेड येथुन कागद पत्र प्राप्त झाल्याने माहिती दिली. मा. पो. नि. साहेब यांचे आदेशाने आ म्र नं 19/2023 कलम 174 भा द वि प्रमाणे npc दाखल करण्यात आली आहे.पुढील तपास लखुळे करीत आहेत.