सागी माल पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न; आरोपी मुद्देमाल टाकून पळाला,गुन्हा नोंद
किनवट/प्रतिनिधी: मा.उप वनसंरक्षक श्री.वाबळे साहेब, व मा.सहायक वन संरक्षक श्री. गिरी साहेब आणि मा.वन परिक्षेत्र अधिकारी श्री. राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 21/04/2023 रोजी गोकुंदा ते कोठारी गस्त करित असताना मोटार सायकल वर सागी माल वाहतूक होत असल्याने संशयावरून सदर वाहनास पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला असता सागी माल मुद्देमाल टाकून पळून गेले. सदर कार्यवाहीत प्र. गु.री.क्र.06/2023 दिनांक 21/04/2023 नुसार गुन्हा नोद करून सागी नग 21 व घमी.0.0941माल जप्त करुन योग्य ती कार्यवाही करण्यात आली. सदर कार्यवाहीत वनपाल श्री एस एम कोम्पलवार श्री.सांगळे,श्री यादव,श्री.व कत्तूलवार व वनरक्षक श्री. दांडेगावकर, झंपलवाड ,फोले आणि वाहन चालक श्री. बाळकृष्ण आवले यांनी कार्यवाही केली.