*परभणी येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ देगलूर कड – कडीत बंद*
देगलूर /प्रतिनिधी : परभणी शहरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची मंगळवारी आरोपी नामे सोपान पवार नामक समाज कंठकाणे विटंबना केली. या घटनेच्या निषेधार्थ आज दि. 13-11-2024 संविधान प्रेमी कडून देगलूर बंदला शांततेत पार पाडण्यात आले व दि.11.12.2024 रोजी पुकारलेल्या परभणी बंदला हिंसक वळण लागले होते. बंद च्या काळात अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेक झाल्याची माहिती समोर येत आहे. जेव्हा जेव्हा राज्यामध्ये भाजपचे सरकार येते तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची किंवा मागासवर्गीय अस्मितेच्या प्रतीकाची अशी तोडफोड विटंबना होण्याची ही पहिलीच घटना नाही या अगोदर भीमा कोरेगाव दंगल असेल किंवा अजून कितीतरी घटना असतील अश्या अनेक जातीय दंगली महाराष्ट्रात भाजपच्या काळात घडत आलेल्या आहेत.
महापुरुषांचे स्मारक, प्रतीके सुरक्षा, मागासवर्गीय सुरक्षा राखण्यात भाजप अपयशी ठरलेले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी या संपूर्ण घटनेची जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दयावा आणि दि. 11 डिसें. ला झालेल्या आंदोलनाच्या खोट्या गुन्ह्यात आंबेडकर विचार धारेची तरुणांना अडकवण्याचा प्रयत्न जर केलात तर याहूनही तीव्र आंदोलने व मोर्चे काढण्यात येतील याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले.
यावेळी देगलूर शहर व ग्रामीण भागातील हजारो सर्व धर्मीय संविधान रक्षक उपस्थित होते.
शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर महाविकास आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला.
महाविकास आघाडीच्या वतीने दोषीवर कारवाई करा तसेच परभणी येथील युवकांवर झालेला गुन्हा मागार घ्यावा असे उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.यावेळी महाविकास आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होते.