किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

बोधडी वनपरिक्षेत्र मधील मौजे बोधडी खुर्द येथे राखीव वनामध्ये मियावाकी पद्धतीने रोपे लागवड चा कार्यक्रम

किनवट ( प्रतिनिधी ) .प्रतिकूल परिस्थिती असतानाही वन विभाग मियावाकी मिशन अंतर्गत तालुक्यात मोठ्या प्रमाणात घनवनाची यशस्वी निर्मिती करत असून त्यांचे हे कार्य प्रशंसनीय आहे .असे गौरवोद्गार आ . भीमरावजी केराम यांनी बोधडी वन विभागातर्फेआयोजित बोधडी ( खू) येथे राखीव वनामध्ये मियावाकी पद्धतीने रोपे लागवड कार्यक्रमात आपल्या अध्यक्षीय भाषणात काढले .


याबाबत सविस्तर वृत्त असे की वन विभाग नांदेड अंतर्गत वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियान सन 2021 मध्ये बोधडी वनपरिक्षेत्र मधील मौजे बोधडी खुर्द येथे राखीव वनामध्ये मियावाकी पद्धतीने रोपे लागवड चा कार्यक्रम दिनांक 21 / 6 / 21 रोजी सोमवारी सकाळी साडेदहा वाजता संपन्न झाला . यावेळी कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून किनवट /माहूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार भीमराव केराम, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक , वनविभाचे उपवनसंरक्षक एम. आर .शेख ,किनवटचे वनपरिक्षेत्र अधिकारी के एन खंदारे ,किनवट नगर परिषदेचे माजी अध्यक्ष अनिल तिरमणवारर , जिल्हा परिषदेचे बांधकाम अभियंता रमेश बद्देवार व बोधडी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .बोधडी वनविभागाने बोधडी खुर्द येथील राखीव वनात मियावाकी मिशन अंतर्गत घनवन रोपे लागवडीचा उद्घाटनाचा कार्यक्रम घेतला होता या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक बोधडीचे वनपरिक्षेत्राधिकारीश्रीकांत जाधव यांनी केले . कार्यक्रमाची प्रस्तावना करताना बोधडी च्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी उपस्थितांना सांगितले की रोप लागवड होत असलेली ही जागा पहिले अतिक्रमीत होती . या जागेवरील अतिक्रमण वन विभागातर्फे काढून आता मियावाकी मिशन अंतर्गत रोप लागवड करण्यात येत आहे . कार्यक्रमाचे प्रस्ताविक नंतर कार्यक्रमास उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांचे बोधडी वन विभागातर्फे सत्कार करण्यात आले . नागरिकांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या काळजीपूर्वक वृक्षसंवर्धन करावे असे आव्हान उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक उपस्थितांना केले .उपवनसंरक्षक एम आर शेळके यांनी ही जनतेने वन विभागाला वृक्ष संवर्धनासाठी सहकार्य करावे असे कळकळीचे आवाहन यावेळी केले .आमदार भीमराव जी केराम यांनी वृक्ष लागवड करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले .बोधडी वन विभागातर्फे उपस्थितांना मियावाकी पद्धतीने वृक्ष लागवडीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले .यावेळी वनपाल याकुब शेख ,अरुण कुमरे, बी .टी .जाधव , देशमूख, सोनकांबळे , वनरक्षक तोटावाढ , गडवे , काळे , पंधरे , हिंगोले किशन आडे , प्रल्‍हाद आडे , भाऊराव ,भीमा चव्हाणआदीसह इस्लापुर आणि बोधडी येथील वन कर्मचारी उपस्थित होते .

142 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.