किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

वन विभागाच्या गस्तीत इंडिका मध्ये सागवानाचे कट साईज लकडे सापडली.तात्काळ कारवाई

किनवट (प्रतिनिधी ) : किनवट सारखणी रोडवर वनविभागाचे पथक गस्त करत असताना पहाटे 6=30 वाजेच्या दरम्यान राजगड तांडा गावाजवळ रोड लगत MH27 H 7661 नंबरची एक संशयीत लाल रंगाची इंडिका कार उभी दिसून आली . त्यात सागवानाचे कट साईज लकडे दिसून आले त्यामुळे तात्काळ कारवाई करत पथकाने ही कार ताब्यात घेतली .
याबाबत सविस्तर वृत्त असे किनवट वन विभागाचे पथक दिनांक 24 फेब्रुवारीच्या रात्री गस्त करीत असताना दि . 25 च्या पहाटे साडेसहा वाजता राजगड तांडा जवळ एक लाल कलरची इंडिका कार संशयित अवस्थेत आढळले . वन विभागाच्या पथकाने जवळ जाऊन तपासणी केली असता आत मध्ये सागवानाचे कट साईज लाकडे भरून असलेली दिसली . तदनंतर पथकाने कारचा ताबा घेऊन रीतसर 2 पंचासमक्ष जाय मोक्यावर पंचनामा करून सदरील जप्त वाहन व सागी लाकडे हे जप्त करून राजगड आगार येथे जमा करण्यात आली आहे .
ही कार्यवाही उपवनसंरक्षक केशव वाबळे , सहाय्यक वनसंरक्षक जी डी गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी किनवट(प्रा) पी एल राठोड तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी अतिक्रमण निर्मूलन किनवट ए ए काशीकर तसेच वनपाल राजगड जी टी माझळकर , बी एस संतवाले मनोहर कत्तूलवार , एस एन सांगळे वनरक्षक गजानन कापसे ,टी आर घोडके वनमजूर भाऊ सिंग देवला जाधव व वाहन चालक बाळकृष्ण आवले यांनी यशस्वीरित्या पार पाडली .

270 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.