किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

पत्रकार व कुटुंबियांच्या न्यायासाठी आम्ही लढणार : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, लातूर जिल्हा

लातूर : राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, लातूर जिल्हा कार्यकारणीची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीमध्ये लातूर जिल्ह्यातील पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांचे प्रश्न मार्गी लावले जाणार असून पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांच्या न्यायासाठी आम्ही लढणार असल्याचा या बैठकीत निर्धार करण्यात आला. या बैठकीसाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी.आंबेगावे, राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, राज्य उपाध्यक्ष व्यंकटराव पन्हाळे, अजयभाऊ सुर्यवंशी, मराठवाडा अध्यक्ष विष्णू अष्टीकर, लातूर जिल्हाध्यक्ष लहूकुमार शिंदे, जिल्हा संपर्कप्रमुख नितीन भाले, जिल्हा संघटक संजय राजूळे, महिला जिल्हाध्यक्षा वैशाली पाटील,आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी लातूर जिल्हा उपाध्यक्ष दयानंद एरंडे, लातूर तालुका उपाध्यक्ष हरिदास पवार, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनवणे, चाकूर तालुका सदस्य सुनील शिंदे, यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी. आंबेगावे यांनी लातूर जिल्ह्यातील पत्रकारांना कोणतीही अडचण किंवा समस्या निर्माण होऊ देणार नाही असा विश्वास दिला. राज्य उपाध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे आणि लातूर जिल्हा महिलाध्यक्षा वैशालीताई पाटील यांनी महिला पत्रकारांचे विविध प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. राज्य उपाध्यक्ष व्यंकटराव पनाळे यांनी लातूर जिल्ह्यात संघाच्या माध्यमातून पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक मदत करणार असल्याचे सांगितले. राज्य उपाध्यक्ष अजयभाऊ सुर्यवंशी यांनी कोविडच्या काळात ज्या पत्रकारांना मदतीचा हात दिला पाहिजे असे मत व्यक्त केले. मराठवाडा अध्यक्ष विष्णू अष्टीकर यांनी लातूर जिल्ह्यातील गरीब व गरजूंना संघाच्या माध्यमातून शिवभोजन थाळी सुरू करूया असे मत व्यक्त केले. जिल्हा संपर्क प्रमुख नितीन भाले यांनी बँक व खाजगी फायनन्सना लोनचे हफ्ते भरण्यासाठी सवलत मिळवून द्यावी अशी भूमिका मांडली. जिल्हा संघटक संजय राजुळे यांनी गरिबांना मदत करू असे मत स्पष्ट केले तर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केल्याने राज्य पदाधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले. विशेष म्हणजे
सुरेश बनसोडे यांच्या पत्नी महादेवी बनसोडे यांचे कोरोनामुळे निधन झाले असल्याने त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करून साक्षी व श्रुती यांना शैक्षणिक मदत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी पत्रकार सचिन सूर्यवंशी, पत्रकार सुनील फुलारी, पत्रकार नितीन हांडे आदी पदाधिकारी उपस्थित होते

102 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.