किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

पुरोगामी पत्रकार संघ संचलित समित्यांच्या निवडी जाहीर..राशन दक्षता समितीवर जावेद शेख लहानकर तर माहिती अधिकार समितीवर विठ्ठल घाटे यांची निवड..

नांदेड- ( प्रतिनिधी ) नांदेड येथील सोशल डायरी चे संपादक, तथा एक निर्भीड पत्रकार जावेद शेख लहानकर व राजकीय क्षेत्रात, सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले विठ्ठल घाटे यांची दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी साहेब यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष संतोष जाधव, महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष गोपाळराव लाड,सचिव निलेश ठाकरे, कार्याध्यक्ष दशरथ रोडे, मराठवाडा अध्यक्ष अशोक दादा वायवळ यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्हा अध्यक्ष शंकर सिंह ठाकुर यांच्या उपस्थित सदरील निवडीचा कार्यक्रम पार पडला.
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचा सहावा वर्धापन दिन नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे काही दिवसांपूर्वीच मोठ्या उत्साहात संपन्न झाला होता. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या सर्वच कानाकोपऱ्यातून पुरोगामी पत्रकार संघाचे पदाधिकारी तसेच पत्रकार बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. त्या कार्यक्रमानंतर नांदेड येथील जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी दुसऱ्यांदा शंकर सिंह ठाकुर यांच्या हाती आली. त्यांनी ती जबाबदारी स्वीकारून पुरोगामी पत्रकार संघ संचलित “राशन दक्षता समिती”च्या जिल्हाध्यक्ष पदी जावेद शेख लहानकर तर “माहिती अधिकार समिती”च्या जिल्हाध्यक्ष पदी विठ्ठल घाटे यांच्या निवडी ही नांदेड येथील कार्यालयात जाहीर केल्या.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना शंकर सिंह ठाकुर म्हणाले की, पुरोगामी पत्रकार संघ हा सर्व सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी लढणारा संघ आहे. कामगार, शेतकरी, महिला व अन्य कुणावरही अन्याय होत असेल तर त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आपणा सर्वांना लढावच लागणार आहे. यावेळी विरोधकांकडून आपणाला विरोधही होऊ शकतो आणि धमकी पण येऊ शकते, अशावेळी आपल्या संघाची एकजुट दाखवून आपल्या सर्वांना खांद्याला खांदा लावून अन्याय ग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा पुकारावा लागणार आहे. तुम्ही कोणत्याही क्षणी आवाज द्या संपूर्ण पत्रकार संघ तुमच्या पाठीशी आहे,असेही ते म्हणाले. या नंतर पत्रकार संघाची पुढील वाटचाल कशी असेल यावर मारोती शिकारे यांनी प्रकाश टाकला.
पुरोगामी पत्रकार संघाचे नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष मारोती शिकारे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर नांदेड जिल्हा महासचिव प्रकाश कोल्हे यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी पोलीस टाईम्स चे नांदेड जिल्हा प्रतिनिधी मिर्झा गफार बेग, सामाजिक कार्यकर्ते जहीर खान, सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई वाघमारे,अनील कावळे,सामाजिक कार्यकर्ते, अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते.ह्या दोघांच्याही निवडी बद्दल नांदेड जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. मित्र परिवार, सामाजिक, राजकीय, व्यापारी क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

64 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.