राज्य शासनाच्या ‘अपघात व सुरक्षा मोहीम” 2023 चे औचित्य साधून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन….
नांदेड/प्रतिनिधी:
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सुरक्षितता अभियान “सडक सुरक्षा जीवन रक्षा” दि. 11 जानेवारी ते 25 जानेवारी 2023 अंतर्गत राज्य शासनाच्या “अपघात व सुरक्षा मोहीम” 2023 चे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड व श्री गुरुजी रुग्णालय छत्रपती चौक नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन एसटी बस स्टँड परिसर नांदेड या ठिकाणी आज करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी नांदेड आधार व्यवस्थापक आशिष मेश्राम हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विश्वासू प्रवासी संघटना नांदेडचे कार्यालय प्रमुख हरजिंदरसिंघ संधू बसस्थानक प्रमुख यासीन खान यांची उपस्थिती होती
यवेळी सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक ठाकूर, आगार लेखापाल सतीश गुंजकर, तसेच तसेच राज्य दैनिक बाळकडू चे उत्तर विधानसभा पत्रकार संभाजी सूर्यवंशी,आगार लेखापाल गजानन देगावे,वरिष्ठ लिपिक नितीन मांजरमकर ,वाहतूक निरीक्षक अविनाश भिसे, श्री गुरुजी रुग्णालय चे समन्वयक कार्यसन अधिकारी का.ना.शिरसाठ,व्यवस्थपक भास्कर डोईबळे,जनसंपर्क अधिकारी सुरेश शिंदे,तुषार सोनक,डॉ. शेखर चौधरी,डॉ.जयश्री डोले,उपस्थित होते.
एस.टी.आगारातील चालक वाहक व तांत्रिकी कर्मचारी जे उपलब्ध असून जे प्रवास्यासाठी जे नेहमी तत्पर असतात त्त्यांच्यासाठी या कार्यक्रमात रक्तदाब तपासणी, शुगर तपासणी , दातांची तपासणी,मूळव्याध तपासणी चे आयोजन करण्यात आले होते
तसेच भिवराज कलंत्री नर्सिंग इन्स्टिट्यूट सिडको नांदेड येथील परिचारिका आरती भंगारे, प्रियंका गायकवाड,सुनीता जागलेकर,पंचशीला लांडगे,गौतमी चावरे,पौर्णिमा ढवळे,अश्विनी बरकनकर, राजनंदिनी राजभोज यांनी परिश्रम घेतले.
या शिबिरात १४० चालक , वाहक व यांत्रिक प्रशासन कर्मचारी यांची तपासणी करण्यात आली व चालक वाहक यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सर्वजन आनंदित होते.