तेलंगणाच्या नेत्याची महाराष्ट्र सीमावरती भागावर नजर ; मांडवीत एकाच दिवशी दोन माजी खासदार एक आमदार सह माजी आमदार दाखल
मांडवी/(सुनील श्रीमनवार): किनवट माहूरचे आमदार भीमराव केराम अधिवेशनात तर माजी आमदार प्रदीप नाईक हे सुद्धा पक्षश्रेष्ठीच्या संपर्कातच मग्न असल्याचे औचित्य साधून काल सीमावरती भाग असलेल्या मांडवीत अचानक तेलंगणा राज्यातील दोन माजी खासदार व एक विद्यमान आमदार एक माजी आमदार धडकल्याने त्यांचे येथे येण्याचे कारण काय? या राजकीय चर्चेला उधाण आले आहे .
माजी खासदार नागेश घोडाम यांनी तर या भागात पुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भाग घेण्याचा विचार असल्याचे सांगून पक्षाचे उमेदवार देऊ असं संकेत दिला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी या भागातील अनेक गावांना भेटी पत्रकारांना व बार कौन्सिल मध्ये जाऊन वकिलांशी संवाद साधला एकंदरी या नेत्याच्या भेटीमुळे चर्चेत भर पडली आहे. या दोन्ही तालुक्याचा समावेश तेलंगणात करा म्हणून अनेक गावाचे ठराव जमा करणारे विठ्ठल नाईक नागेश घोडाम त्यांच्यासोबत होते हे विशेष.
तेलंगणा राज्यात शेतकरी, शेतमजूर, विधवा अपंग, निराधार यांना मिळणाऱ्या शासकीय योजना आपल्याकडील सीमेवरील लोकांना आकर्षित करीत आहेत. या उलट नांदेडच्या राजकीय नेत्याकडून किनवट माहूर तालुक्याच्या विकासाकडे होणारे दुर्लक्ष व सपत्नीक वागणूक त्यामुळे जनता वैतागली आहे. नांदेड पासून 200 किलोमीटर अंतरावर असल्याने भौगोलिक दृष्ट्या या दोन्ही तालुक्याला परवडणारे नाही. यामुळे अनेक वर्षांपासून किनवट जिल्हा व मांडवी इस्लापूर तालुक्याची मागणी होत आहे जिल्हा सत्र न्यायालयापासून तर अनेक शासकीय कामासाठी रोज लोकांना नांदेड येथे जाणे आर्थिकदृष्ट्या व वेळेच्या अनुषंगाने परवडत नाही. भोकर, अर्धापूरच्या अलीकडील भागावर नेहमी अन्याय होतो. ही दोन तालुके नांदेड जिल्ह्यात आहेत याचा विसर राजकीय नेत्यांना पडतो म्हणून त्यापेक्षा “पूर्वीचा आदिलाबाद जिल्हा बरा” अशी तिखट प्रक्रिया या सीमावरती भागात नेहमी ऐकवास मिळत असते पूर्वीचा तेलगू देशम पार्टी आता राष्ट्रीय पक्ष झाल्याने पक्ष विस्ताराची गरज आहे. त्यामुळे या पक्षाची सुद्धा नजर आता शेजारच्या राज्यावर आहे . त्याची सुरुवात म्हणून की काय काल त्या पक्षाचे माजी खासदार नागेश घोडाम व विद्यमान आमदार बाबुराव राठोड मांडवीत दाखल झाले त्या पाठोपाठ भाजपाचे माजी खासदार रमेश राठोड व माजी आमदार सुमनताई राठोड हे सुद्धा आले या भेटीमध्ये त्यांनी आपल्या आपल्या नातेवाईकांच्या भेटीसाठी घेतल्या.