निसर्गरम्य डेरला तलावास विद्यार्थ्यांची भेट
लोहा-तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डेरला येथील पहिली ते सातवीच्या एकशे सतरा विद्यार्थ्यांनी गावाला लागूनच असलेल्या निसर्गरम्य तलावास राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक पंडित पवळे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी सकाळी १० वाजता “पाणी अडवा,पाणी जिरवा””,पाणी वाया घालवू नका”,”पाण्याची बचत काळाची गरज “असे विविध घोषणा देत विद्यार्थी ,शिक्षक तलावा काठी गेले .तेथे विद्यार्थ्यांना पाण्याचे श्रोत,सजीवाला पाण्याची गरज ,मानवी जीवनात पाण्याचे महत्त्व शिक्षक दत्तात्रय पांचाळ यांनी सांगितले .तर जलप्रदुषण मानव निर्मित समस्या प्रात्यक्षिकाद्वारे जेष्ठ शिक्षक उत्तम क्षीरसागर,सौ.मनिषा पवार,सौ.दीपाली सनपूरकर,सौ.अंजली भंडे,सौ.ज्योती हंबर्डे यांनी माहिती सांगून दूषित पाण्याने सजीवावर विपरीत परिणाम होतात.पोटाचे व इतर बरेच रोग होतात .म्हणून नदी,नाल्यात,तलावात जनावरे धूवू नका,औषध फवारणीचे पंप धुवू नका,वेगवेगळी रसायने पाण्यात सोडू नका,कचरा ,मेनकापड,पुजेचे साहित्य पाण्यात टाकू नका,आंघोळ ,कपडे अथवा पाणी दूषित होईल असे कृत्ये करू नका .असा संदेश यावेळी शिक्षकांनी दिला .दूषित पाण्यामुळे मानव,इतर प्राणी ,वनस्पती आणि जलीय जीव यांना अपाय होतो .म्हणून नैसर्गिक पाण्यात एखाद्या बाह्य पदार्थ अथवा उष्णता याची भर पडल्याने पाणी दूषित होते आसे सांगितले .विद्यार्थ्यांना थोड्याशा पाण्यात हुंदडण्याचा आनंद मिळवून दिला.अशी शाळेची सुंदर क्षेत्रभेट संपन्न झाली .ह्याचे पालकांनीही कौतुक केले .