बेल्लुर (बु) रस्त्यावर युवकाचा घात की अपघात ?
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.14.जिल्यातील धर्माबाद तालुक्या मधील धर्माबाद- बेल्लुर (बु) रस्त्यावर दि.११ ऑक्टोबर रोजी एका युवकांचा मोटरसायकल वरुन जात असताना अपघात झाला.असे म्हणुन उपचारासाठी रुग्णालयात आणले असता दुसऱ्या दिवशी त्या युवकाचा दि.१२ रोजी मृत्यू झाला.हा अपघात झाला नसून त्याला बोलावून घात केल्याचा संशय केला जात आहे.
शहरातील फुलेनगर येथील युवक अजयरत्न दिगांबर सोनटक्के (वय ४४) हा दि.११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी जेवण करून घरीच बसला होता.
तेवढ्यात बेल्लुर (बु) येथील युवकांनी अजयरत्न यास फोन करून बोलावून घेतले.काही वेळात धर्माबाद ते बेल्लुर(बु) रस्त्यावर मोटरसायकलवर अजयरत्न सोनटक्के याचा अपघात झाला म्हणून यास धर्माबाद शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणले.अजयरत्न यास डोक्याच्या पाठीमागे जबर मार लागला होता,डाव्या पायाचा अंगठा सह इतर बोटाचे चेंदामेंदा झालेले होते.गुढग्याला मारहाण झाली होती बाकी कडे कुठे च मार लागला नव्हता म्हणून अजयरत्न सोनटक्के याचा अपघात झाला नसून त्याला बोलावून घात केल्याचा संशय केला जात आहे.
अजयरत्न सोनटक्के यांच्या पश्चात वडील,पत्नी,एक मुलगा,एक मुलगी,दोन बहिणी असा परिवार आहे.
अजयरत्न हा घरातील एकुलता एक मुलगा होता,घराची पुर्ण जबाबदारी त्याच्यावर असल्याने घरातील कर्तापुरुष निघुन गेल्याने कुटुंबा वर दुःखाचे डोंगर कोसळले.अजयरत्न चे मुलगा, मुलगी लहान असुन त्यांने गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
प्रतिक्रिया—
माझे पती जेवण करून घरीच बसले होते तेवढ्यात सायंकाळी एकाचा फोन आला,त्यांना मी जाऊ नका म्हणटले पण ते ऐकले नाहित,बेल्लुर ला त्या व्यक्तीला सोडवण्यास जात आहे असे म्हणुन निघून गेलेत माझ्या पतीचा अपघात झाला नसून खुन करण्यात आला,त्याची चौकशी करण्यात यावी.असे मयत अजयरत्न सोनटक्के यांची पत्नी श्रद्दा सोनटक्के यांनी आमच्या प्रतिनिध