माहूर शहरातील जि.प.कें.प्रा.शाळा व नवी अबादी उर्दू प्राथमिक शाळेमध्ये शिक्षकाची नेमणुक करण्याची मागणी
माहूर: शहरातील जि.प.कें.प्रा.शाळा व नवी अबादी उर्दू प्राथमिक शाळेमध्ये शिक्षकाची नेमणुक करण्यात यावी यासाठी आज नांदेड येथे मा.मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड वर्षा ठाकूर आणि मा. शिक्षण अधिकारी साहेब जिल्हा परिषद नांदेड यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.
माहूर शहरातील मुस्लिम समाज बहुसंख्ये असल्याने
विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे मागील बऱ्याच वर्षा पासून जि.प.कें. प्रा.शाळा मध्ये वर्गाची संख्या एक ते चार आणि विद्यार्थी संख्या १३६ आहेत . सदर शाळेवर तीन शिक्षकांची नेमणुक आहे. आणि नवी अबादी उर्दू प्राथमिक शाळा मध्ये विद्यार्थी संख्या ६९ वर्गाची संख्या एक ते चार आहेत . एक शिक्षक सदर शाळेवर नेमणुक आहेत .परिणामी विदयार्थ्यांचा शिक्षणाच्या मूलभूत अधिकारावर गदा येऊ नये. मुस्लिम समाजातील गोरगरीब विदयार्थ्यांचे भविष्य अंधकारमय होऊ नये .करिता सदर शाळेवर योग्य संख्येत शिक्षकांची नेमणूक होने आवश्यक आहे. सदर समस्यांवर योग्य ती कार्यवाही होऊन तात्काळ शिक्षकांची नेमणूक करण्यात यावी.अशी विनंती केली याप्रसंगी मुफ़्ती शफीउद्दीन साहेब , निसार कुरेशी, इरफान फारूकी , इरफान शेख आजीम सय्यद आदी उपस्थित होते.