फिल्टर दुकानदारांनी ग्राहकांच्या जीवाशी मांडला खेळ;भरमसाठ पैसे मोजूनही शुद्ध पाणी मिळत नाय; फिल्टर पाण्यामध्ये डास सदृश्य आळ्या.
किनवट/प्रतिनिधी:
किनवट शहरात फिल्टर पाण्याची शेकडोंच्या संख्येने दुकाने थाटली गेली आहेत परंतु भरमसाठ पैसे मोजूनही शुद्ध पाणी न देता ग्राहकांच्या जीवाशी खेळ मांडला जात आहे.
अनेकांच्या फिल्टर पाण्यामध्ये डास सदृश्य आळ्या असल्याचे निदर्शनात येत आहे.आज अशाच एका फिल्टर पाण्याचा दुकानातून पाणी ग्राहका पर्यंत पोचवले असता पत्रकार राजेश पाटील यांच्या घरी त्यातून डास अदृश्य आळ्या दिसून आळ्या निदर्शनास आल्या.
सदरील बाब प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ संलग्नित इलेक्ट्रॉनिक प्रेस मीडिया च्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर पत्रकारांनी किनवट चे नगराध्यक्ष आनंद मच्छेवार तसेच स्वच्छता निरीक्षक चंद्रकांत दुधारे यांना निवेदन देण्यात आले व किनवट शहरातील जेवढे फिल्टर पाण्याची दुकाने आहेत त्यांच्यावर न.पा.ने लक्ष ठेवण्यासाठी व योग्य ती कारवाई करण्यासाठीची मागणी करण्यात आली. याप्रसंगी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांनी शहरातील सर्व फिल्टर दुकान मालकांना सूचना देण्यात येईल असे आश्वासन दिले.
सध्या सगळीकडेच कोरोना महामारीने थैमान घातले असून अनेक बिमाऱ्यां समोर येत असताना शुद्ध पाणी मिळणे किनवट मध्ये कठीण झाले आहे.भरमसाठ पैसे देऊनही साधेच पाणी मिळत आहे. अनेक वेळी ग्राहकाने तक्रार करूनही पाणी फिल्टर वाले याकडे दुर्लक्ष करत आहेत. दूषित पाणी पुरवठा न करता शुद्ध पाणी पुरवण्यात यावे. अन्यथा दूषित पाणी पुरवठा करणारे फिल्टर वाल्यांचे परवाने रद्द करून दुकानास सील करण्यात यावे अशी विनंती नगराध्यक्षाकडे करण्यात आली आहे.