ग्राहकांचा विश्वास, कर्मचाऱ्यांच्या कार्यतत्परतेने गोदावरीचा पाया भक्कम -राजश्री पाटील ; गोदावरी अर्बनचा दहावा वर्धापनदिन उत्साहात
नांदेड : ता.17 : तळहतावर पोट असणारी व्यक्ती देखील इतरांप्रमाणेच कुटुंबासाठी कष्ट करते. मात्र अनेकजण रोज कमावलेला एकही पैसा जमा ठेवत नाही. त्यामुळे आशा व्यक्तीस कुठलीच बँक कर्ज देण्याचे धाडस करत नाही. खासदार हेमंत पाटील यांनी दहा वर्षांपूर्वी सर्वसामान्यांना आपलीशी वाटाची अशी मल्टीस्टेट बँक उभारण्याचा विचार केला, त्याची सुरुवात एका बचत गटापासून झाली आणि आज गोदावरी अर्बनच्या रुपाने हा विचार प्रत्यक्षात आला असून, सहकार क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था म्हणून गोदावरी अर्बन नावारुपाल आली आहे. हे केवळ ग्राहकांनी बँकेवर दाखवलेला विश्वास आणि कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना दिलेली कार्यतत्पर सेवा यामुळेच गोदावरी अर्बन आज भक्कम पायावर उभी आहे. असे वक्तव्य गोदावरी समुहाच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांनी येथे केले.
गोदावरी अर्बनचे संस्थापक तथा खासदार हेमंत पाटील, व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारसूर्य मुख्यालयात नुकताच गोदावरी अर्बनच्या मुख्य शाखेचा दहावा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्ष म्हणून राजश्री पाटील बोलत होत्या. पुढे बोलताना श्रीमती पाटील म्हणाल्या की, गोदावरी अर्बनने सहकार क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्यात अग्रेसर राहून सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक समाजपयोगी कार्य केले जात असल्याचे त्या म्हणाल्या.
मागील दहा वर्षात झालेल्या सर्वच घडामोडीना यावेळी राजश्री पाटील यांनी उजाळा दिला व गोदावरी अर्बनच्या आजवरच्या वाटचालीत ज्यांचे योगदान मिळाले त्यांच्याबद्दल कृतत्रता व्यक्त करून असेच सहकार्य यापुढेही लाभेल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. याचाच एक भाग म्हणून दहा वर्षांपूर्वी ज्या वास्तूमध्ये गोदावरी अर्बनची मुख्य शाखेचा शुभारंभ झाला त्या वास्तूचे मालक विजयकांत सूर्यवंशी यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मुख्यालय अधिक्षक विजय शिरमेवार यांचा मुलगा गणराज शिरमेवार याने जालिंधर ( पंजाब ) येथे पार पडलेल्या वोमीनम मार्शल आर्ट असोसिएशन राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविल्याबद्दल त्यांचा देखील यावेळी गोदावरी समूहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला सेवानिवृत्त आदर्श शिक्षक अशोक तवर , देविदास पोळकर,शिवाजी माने ,चंद्रशेखर शिंदे ,प्रशांत कदम , गोपाल जाधव यांच्यासह मुख्य शाखेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, दैनिक ठेव,आवर्त ठेव प्रतिनिधी व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.