किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

जगद्गुरू नरेद्राचार्य महाराज यांच्या समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळ्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे!-रामलू यनगंटिवार

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.17. जिल्यातील धर्माबाद येथे अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महराज यांच्या समस्या मार्गदर्शन सोहळ्यासह विविध समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन शुक्रवार व शनिवार दिनांक २४ व २५ जून रोजी श्री क्षेत्र माऊली माहेर मराठवाडा उपपिठ सिमुरगव्हाण तालुका पाथरी जिल्हा परभणी येथे सकाळी ९ वाजता आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री सांप्रदाय सेवा समीती धर्माबाद चे प्रसिध्दी प्रमुख रामलू यनगंटिवार यांनी दिली आहे.

तसेच सदरील सोहळ्यास जास्तीत जास्त संख्येने धर्माबाद व तेलंगणा सीमेवरील भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.

सदरील कार्यक्रमासाठी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील निरीक्षक, जिल्हाध्यक्ष, हिंदू संग्राम सैनिक,युवा सेना,महिला सेना सर्व तालुकाप्रमुख व सर्व सेवा केंद्र सदस्य ,आरती समितीतील सदस्य मंडळी व भाविक भक्त आदींनी दर्शन व आशीर्वाद घेण्यास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

संस्थानच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रमासोबतच अंधश्रद्धा निर्मूलन अंतर्गत मार्गदर्शन व दर्शन सोहळा संपन्न होणार आहे.व दिनांक २४ व २५ जून रोजी दोन्ही दिवशी कार्यक्रमात परमश्रध्देय जगद्गुरुश्रींचे अमृततुल्य अध्यात्मिक विषयावर मार्गदर्शन लाभणार आहे. या समस्या व मार्गदर्शन सोहळ्यासाठी येणाऱ्या भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था मोफत केलेली आहे.

तरी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाचा धर्माबाद तालुका व तेलंगणा सीमेवरील पंचक्रोशीतील भक्तगणांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री सांप्रदाय सेवा समितीचे नांदेड उत्तर प्रमुख तथा धर्माबाद तालुक्याचे प्रसिध्दी प्रमुख रामलू यनगंटिवार यांनी केले आहे.

120 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.