किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेवर लक्ष केंद्रित करून प्रशासनात यावे.. उपविभागीय अधिकारी सौम्या शर्मा

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.3.जिल्यातील देगलुर तालुक्या मधील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेवर लक्ष केंद्रित करून प्रशासनात यावे तसेच विद्यार्थ्यांना युपीएससी,एमपीएससी मार्गदर्शन करण्यासाठी मी तयार आहे,असे मनोगत माननीय सौम्या शर्मा सहाय्यक जिल्हाधिकारी देगलूर यांनी प्राध्यापक उत्तमकुमार कांबळे मित्र परिवार आयोजित स्पर्धा परीक्षा बक्षीस वितरण व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरात देगलूर महाविद्यालय देगलूर येथे व्यक्त केले.

महात्मा ज्योतीबा फुले व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेचा बक्षीस वितरण समारंभ व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सोहळा देगलूर महाविद्यालय देगलूर येथे थाटामाटात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार मा. प्रतापराव पाटील चिखलीकर हे होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्रा.गौतम भालेकर व प्रकाश सोनकांबळे यांच्या ‘बदलून टाकू समाज जीवन’ या सुमधुर गीताने झाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. उत्तमकुमार कांबळे यांनी केले. आपण समाजाचे काही देणे लागतो, या सामाजिक जाणिवेतून मी हे कार्य करत आहे आणि विद्यार्थी स्पर्धा परीक्षेकडे वळाले पाहिजे हा प्रामाणिक हेतू यामागे होता असे प्राध्यापक उत्तमकुमार कांबळे यावेळी म्हणाले.

कठोर शिस्त असेल तरच विद्यार्थी घडत असतो असे मत व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी व्यक्त केले. मी या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे, या महाविद्यालयाच्या उज्ज्वल यशाची परंपरा विद्यार्थ्यांनी कायम ठेवावी असा मानस मा. रामदास पाटील सुमठाणकर यांनी बोलून दाखवला.

या परिक्षेत प्रथम क्रमांक बालाजी मैलागिरे, द्वितीय क्रमांक सचिन कडलवार व तृतीय क्रमांक अनिता उल्लेवार यांनी पटकावला. सचिन जाधव, अविनाश माळगोंडे व श्यामसुंदर भंडरवार यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सदस्यपदी निवडून आल्याबद्दल प्रा. उत्तमकुमार कांबळे यांचे भाऊ डाॅ. संजय कांबळे आणि एम.बी. बी.एस.पदवी उत्तीर्ण झाल्याबद्दल प्रा. उत्तमकुमार कांबळे यांचे भाचे डाॅ. प्रतीक बबनराव सुर्यवंशी यांचा सत्कार खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आला.

विद्यार्थ्यांना युपीएससी ची तयारी करण्यास काही मदत हवी असेल तर ती मदत करण्यास मी तयार आहे,असे आश्वासन खासदार मा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केली.कार्यक्रमाचे प्रभावी असे सूत्रसंचालन अनिलकुमार वाघमारे सर यांनी केले. प्रा. विशाल बोरगावकर यांनी उपस्थितांचे तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत करणा-या सर्वांचे आभार मानले.

या कार्यक्रमास भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, लक्ष्मणराव ठक्करवाड साहेब,माजी नगराध्यक्ष गंगाधर जोशी साहेब, रामदासजी पाटील सुमठाणकर, अ.व्या.शि.संस्थेचे अध्यक्ष मा. प्रकाश पाटील बेंबरेकर,सचिव शशिकांतशेठ चिद्रावार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मोहन खताळ, मा.सोहन माछरे साहेब पोलिस निरीक्षक देगलूर,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अनिकेत पाटील राजूरकर, प्रा.डाॅ.संजय कांबळे,प्रा.डाॅ. व्हि.जी.शेरीकर,शिवाजी कनकंटे साहेब तालुकाध्यक्ष भाजप, श्रावण पाटील भिलवंडे, अनिल पाटील खानापूरकर, अशोक गंदपवार माजी. नगरसेवक,प्रशांतजी दासरवाड गटनेता भाजप,अशोक साखरे, दिगंबर सावकार कौरवार, निवृत्तीदादा कांबळे,अशोक कांबळे देगलुरकर,नामदेव पाटील थडके,डॉ.प्रतीक सूर्यवंशी,अविनाश देशपांडे, प्रल्हाद उमाटे,अनिल कदम, व्यंकटराव बोरगावकर,अशोक डुकरे,गंगाधर दाऊलवार इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.उत्तमकुमार कांबळे मित्र परिवारातील सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.यात प्रामुख्याने विकास देगलुरकर,किशनराव पांचाळ,अनिल हसनाळकर, विकास नरबागे,किरण कांबळे, दोंतुलवाड सर,मिरलवार सर, मंगरूळे सर,कपिल वाघमारे, रामेश्वर कंधारे,हर्ष कु-हाडे, सोनल कु-हाडे,अमोल सोनकांबळे, विशाल बोरगावकर, इशिकांत कांबळे, आदींनी विशेष मेहनत घेतली.

हा कार्यक्रम थाटामाटात यशस्वी करण्यात देगलूर महाविद्यालय देगलूर च्या सर्व प्राध्यापक वृंदांचा व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा सिंहाचा वाटा आहे.

66 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.