किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

नाली बांधकामचे छत कामगारांच्या अंगावर कोसळले.कामगार जखमी* नालीचे काम हे निकृष्ट दर्जाचे* संबंधित अधिकारी यांचे लक्ष कुठे?

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.16.नांदेड ते बिदर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ वरील उस्माननगर येथे नाली बांधकामा वरील बांधकाम कामगार पाट्या काढताना छत अंगावर पडल्याने जागीच जखमी झाला आहे.त्यास उपचारासाठी नांदेड येथील दवाखान्यात दाखल केले.

नांदेड ते बिदर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ वरील उस्माननगर येथे मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू आहे.या महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे आसल्याचे अनेकांनी अधिकारी व वरिष्ठांना वेळोवेळी सांगितले होते.

राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूने नालीचे काम चालू केले आहे. नाली खोदताना व लाईटचे खांब रोवण्यासाठी गुत्तेदाराने नामी शक्कल व दुजा भाव करुन काम उरकून घेतले आहे.

आज १६ एप्रिल रोजी सकाळी विश्वनाथ भिसे यांच्या घराजवळील नाली बांधकाम व छत टाकलेले पाटी काढतांना पश्र्चिम बंगाल राज्यातील बालाघाट येथील मजूर कामगार नयन यांच्या अंगावर पडल्याने तो जागीच बसला व जखमी झाल्याचे पाहुण तेथील उपस्थित संदीप पाटील घोरबांड,साईनाथ भिसे,अन्य तरुणांनी नयन यास बाहेर वढून काढले.व नांदेड ला तात्काळ उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले.
कमरेच्या खाली मार लागल्याने त्यास उभे राहू शकत नव्हता.

राष्ट्रीय महामार्ग रोडवरील दोन्ही कडील नालीचे काम हे निकृष्ट दर्जाचे होत आहे.वरील छतावर भेगा पडत असल्याने माल कमजोर वापरत आहेत.गजाळी बारीक वापरत असल्याने छत कोसळला आहे.

या घटनेला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे.राष्ट्रीय महामार्ग रोडवरील दोन्ही बाजूने नालीचे काम बोगस होत आहे,तरी संबंधित अधिकारी यांनी लक्ष देवून संबंधित गुत्तेदारावर कारवाई आशी मागणी होत आहे.

116 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.